Saturday, November 9

विचारतील विचार...

चर्चा करणं, 
सांगन, 
विचारण, 
माहीत असणं, 
माहीत करून देणं, 
माहित करुन घेणं, 
समजवन, 
समजावून सांगणे, 
समजून घेणं, 
म्हणणं वेगळं, 
बोलणं वेगळं ...
हे सगळे शब्द वेग वेगळे आहेत

Thursday, October 17

मनातलं

मनातलं 
 नुकतीच आई झालेली मुलगी माहेरी गेली आईला मनातलं दुःख सांगायला, 
आईच्या शब्दातील दुःख ऐकून तिच्या शब्दांनी माघार घेतली...
अश्रू फक्त ओघरत होते कळेना तिला काय करावे, 
मग तिने स्वतः त्या दुःखातून सावरण्याचा निर्णय घेतला, 
प्रयत्न खूप करत होती सावरेल पण तिला स्वतःला सावरता येयीना, 
मग मनातलं सांगावं तरी कुणाला तिने...
THR

Friday, January 19

विचारातील विचार...

 विचारांच्या वाटेवर विचार येत असतात,

अर्णवा (अथांग सागर) एवढ्या या विचारांच्या वाटेतूनच

कवितेच्या ओळी जुळतात...

Friday, October 6

मन...3

    नेहमी प्रमाणे काम आटपून ती रूम मध्ये आली... झोपायला नेहमी प्रमाणे जवळ जवळ ११:३० झालेच होते... तिने एक नजर त्याच्यावर टाकली तर तो फोन घेऊन बसला होता... तिने उशी नीट केली आणि पाठ बेडवर ठेकवली आणि डोळे बंद केले... तेवढ्यात तिला तिच्या कपाळावर त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिला जाणवला.... आता पर्यंत ओढलेल्या त्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य उमटलं... तिच्या कानाशी अगदी तिलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात तो बोलतो " *दमलीस का ग?* " तिने हलकं हसून नकारार्थी मान हलवली आणि हळूच नाही बोलली... तिचे ओठ जरी खोट बोलत असले तरी तिचे डोळे खर बोलत होते... त्याने तिला त्याच्या कुशीत ओढल... आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केलं..... तीही त्याच्या मिठीत विसावली आणि मनात विचार येऊन गेला..." कसं असतं ना हे वेड *मन* ... साध्यासा २ शब्दाने सुखावून गेले... कोण म्हणत सुखी राहायला श्रीमंती गरजेची आहे... आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचे *प्रेमाचे* २ शब्द ही पुरे असतात...ह्या थकलेल्या मनावर हळुवार फुंकर घालायला... मग पुन्हा तयार होत... ते उद्यासाठी" .... ती विचार करत...त्याच्या मिठीत झोपी गेली...

Sunday, June 11

आदर...2

 आपला दिलेल्या सन्मानाने

आपला आत्मसन्मान अवलंबून असतो

Wednesday, May 10

श्रद्धा की अंधश्रद्धा...1

 श्रद्धेची गोडी वाढवण्यासाठी,

कधीकधी अंधश्रद्धेशी सांगड घालावी लागते...