Thursday, June 26

जबाबदारी आणि कर्तव्य✨


"जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये
स्वप्नांना विसरायचं असतं..."
कारण स्वप्नं पाहणं सोपं असतं,
पण ती जगण्यासाठी आयुष्य थांबत नाही...

आई म्हणून, मुलगी म्हणून,
कधी बायको म्हणून, तर कधी सून म्हणून...
स्वतःची ओळखच हरवते,
फक्त 'कुणाची तरी' होऊन जगावं लागतं.

स्वतःच्या स्वप्नांना शांत करत,
इतरांच्या हसण्यामध्ये समाधान शोधावं लागतं...
कारण जबाबदाऱ्या कधी थांबत नाहीत –
आणि कर्तव्याची सीमा कुठेच संपत नाही.

Tuesday, June 24

"बायकांचं गेट-टुगेदर"😇

"बायकांचं गेट-टुगेदर"

"बायकांचे get-together कुठं होते हो?"
हा प्रश्न विचारला, की उत्तर फारसं शोधायला लागत नाही – ते असतं लग्नात, कुणाच्या बारशात, किंवा एखाद्या कार्यक्रमात!

घर, संसार, मुलं, स्वयंपाक, जबाबदाऱ्या – या चक्रव्यूहात अडकलेल्या बायका स्वतःसाठी वेळ कुठं काढणार? त्या भेटतात ते फक्त एखाद्या कार्यक्रमात – आणि तिथंच मग एक स्फोट होतो – गप्पांचा, आठवणींचा, आणि काहीशी चुगल्यांचाही!
जसे की,
"अगं, काय गं चाललंय तुझं?"
एखादी दोन वर्षांनी भेटलेली मैत्रीण, एकेकाळची शेजारीण, किंवा नणंद-भावजयी – कार्यक्रमाच्या गडबडीत एकमेकांच्या डोळ्यात नजर मिळते आणि गप्पा सुरु होतात.

“तुझा मोठा झाला का ग आता?”
“हो गं, दहावीला आहे, आणि ऐकतच नाही काही!”
“तू अजून नोकरी करतेस की सोडलंस?”
“नाही गं, आता घरातलीच सगळी मॅनेजमेंट!”
या काही मिनिटांच्या बोलण्यात जगभराच्या आठवणी जाग्या होतात.

😆आणि मग काय गप्पांच्या ओघात थोडं चुगल्यांचं चविष्ट तडका आलाच पाहिजे:
“अगं ती बघ, काय मेकअप केला होता काल – अगदी नटीसारखी!”
“तिचा नवरा म्हणे आता परत गावाकडे रहायला गेला!”
“तिचं मुलगं म्हणे परदेशात गेलंय... आणि आता तिने ग्रुप सुरू केला म्हणे!”
"ती ग्रुप मधून लेफ्ट झाली"
हा "चुगली टाइम" म्हणजे बायकांच्या रिलॅक्स मोडचा मूळ गाभा असतो – कुठेही कटुता नसते, फक्त दिलखुलास बोलणं!

🤍 कार्यक्रमाच्या शेवटी, जेव्हा परत जायचं वेळ येतो, तेव्हा प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर हसण्याचा, मन हलकं झाल्याचा, आणि थोडा समाधानाचा भाव असतो.
कारण त्या काही तासांत त्यांनी फक्त इतरांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी थोडा वेळ दिला असतो.

🎀 शेवटी काय?
बायकांचे गेट-टुगेदर म्हणजे एक छोटासा सण.
तो साजरा होतो साडीच्या चकचकीत पदरात, गोड बोलणं आणि मायेच्या नात्यात.
अशा क्षणांतूनच जन्म घेतं – स्त्रीत्वाचं खरं सौंदर्य.

"बायका भेटल्या की चहा उकळतो ☕ आणि आठवणी नक्कीच उफाळतात😇!"
THR✨

Wednesday, June 18

सुरवात0️⃣

"प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात 'शून्या'पासूनच होते... जितकी लवकर सुरुवात कराल, तितका कमी त्रास आणि त्याहून जास्त लवकर यशाचा आनंद मिळतो!"
THR✨

Sunday, June 15

एकांत...💫

कधीतरी एकांतात बसावे,
गर्दीपासून दूर, शब्दांपासून लांब…
तिथे नसावी कोणतीच चाहूल,
फक्त श्वास आणि मनाचा गूढ गूंज...
THR