Friday, August 15

एकांत ✨

बस किंवा रेल्वेच्या खिडकीजवळची ती जागा…
तिथे सापडतो आपला एकांत.
आणि त्या एकांतात… मला मीच भेटते.

कधी आपण भूतकाळात हरवतो,
कधी भविष्याच्या स्वप्नात रमतो,
तर कधी वर्तमानात जगत राहतो.

या खिडकीजवळच्या एकांतात
आपले तीन जिवलग मित्र भेटतात –
भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान.

ते तिघे आपल्याला दोनच गोष्टी देतात –
आनंद… आणि दुःख.

कधी डोळ्यांतून ओघळणारे अश्रू
आनंदाचे असतात, तर कधी दुःखाचे.
पण… कधी कधी हा एकांत हवा असतो –
आपल्यातला मी पुन्हा सापडावा म्हणून.
THR ✨ 

Wednesday, August 13

मी ✨

"तुम्हाला वाटतं… मी आहे म्हणूनच जग चालतं,
पण हा… तुमचाच गैरसमज आहे.
कारण जग कधीच थांबत नाही…
जसं अखंड वाहणारं पाणी,
एकदा निघालेला शब्द,
आणि निसटून गेलेली वेळ…
सगळं पुढेच सरकत राहतं.
मग आपण का थांबायचं? 🌿✨"
THR ✨ 

Friday, August 8

परीक्षा✨

"देव परीक्षा घेतो हे माहीत होतं… 
पण आता लोकसुद्धा प्रश्नपत्रिका घेऊन बसतात, हे उशिरा का होईना, समजलं!" 😏📜
THR ✨

भाव ✨

भाव ✨

स्वतःसाठी नाही, कुणाला हसवण्यासाठी घेतलेला एक गुलाब – क्षणभर टिकतो,
 पण त्यामागचं प्रेम कायम सांगत राहतं…
“मी आहे तुझ्यासाठी, सदैव!” 💖

एका मित्राने दिलेली पेन, जरी साधी असली, तरी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 
"घे… माझं वापर!" म्हणणं 
– तेच खरं मैत्रीचं ओझं हलकं करणारं बळ! 🤝

सणासुदीला मिळणारी भेटवस्तू नव्हे, तर मनात सहज उमटलेली आठवण –
"तुला आठवलं म्हणून फोन केला..."
 हे चार शब्द म्हणजे हजार भेटवस्त्यांहून मोठं देणं! 📞💌

कधी कधी, किंमती वस्तू मनाला नाही भिडत,
पण प्रेमाने दिलेली ती छोटीशी वस्तू
हृदयात कायमची जागा घेऊन बसते… हीच खरी श्रीमंती! ✨

कारण, दिलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा
देणाऱ्याचे भावच महत्वाचे असतात… ❤️

— THR ✨

Friday, August 1

स्पर्धा ✨

🎯 "स्पर्धा दुसऱ्यांशी नको...
दररोज स्वतःशीच स्पर्धा करा!
कालच्या मीपेक्षा आजची मी भारी असली,
तरच खरी प्रगती!"
THR ✨