Friday, August 8

भाव ✨

भाव ✨

स्वतःसाठी नाही, कुणाला हसवण्यासाठी घेतलेला एक गुलाब – क्षणभर टिकतो,
 पण त्यामागचं प्रेम कायम सांगत राहतं…
“मी आहे तुझ्यासाठी, सदैव!” 💖

एका मित्राने दिलेली पेन, जरी साधी असली, तरी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 
"घे… माझं वापर!" म्हणणं 
– तेच खरं मैत्रीचं ओझं हलकं करणारं बळ! 🤝

सणासुदीला मिळणारी भेटवस्तू नव्हे, तर मनात सहज उमटलेली आठवण –
"तुला आठवलं म्हणून फोन केला..."
 हे चार शब्द म्हणजे हजार भेटवस्त्यांहून मोठं देणं! 📞💌

कधी कधी, किंमती वस्तू मनाला नाही भिडत,
पण प्रेमाने दिलेली ती छोटीशी वस्तू
हृदयात कायमची जागा घेऊन बसते… हीच खरी श्रीमंती! ✨

कारण, दिलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा
देणाऱ्याचे भावच महत्वाचे असतात… ❤️

— THR ✨

Friday, August 1

स्पर्धा ✨

🎯 "स्पर्धा दुसऱ्यांशी नको...
दररोज स्वतःशीच स्पर्धा करा!
कालच्या मीपेक्षा आजची मी भारी असली,
तरच खरी प्रगती!"
THR ✨

Thursday, July 31

एकांत ✨

"मला शांत राहायला आवडतं,
कारण माझ्या शांततेच्या जीवनशैलीत
माझ्या विचारांना पाझर फुटतो…
आणि प्रत्येक थेंब एक नवा अर्थ सांगतो.
या सगळ्यात, माझा एकांत माझा सर्वात जवळचा सोबती ठरतो."
THR ✨

Monday, July 28

चांगुलपणा✨

"चांगले वागून पण वाईट…मग वाईट वागून कुठे चांगले म्हणणार आहेत?"

"ही दुनिया चांगले वागणाऱ्यांची नाही… इथे चांगुलपणा गृहित धरला जातो, 
आणि शांतपणा दुर्बळता समजली जाते."

 "कारण चांगले वागणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखंच…"

 "आता शिकतेय –चांगुलपणा राखायचा… पण स्वतःला विसरून नाही!"
THR✨

Thursday, July 10

💎 खजिना 💎

"कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल, सांगता येत नाही...
म्हणूनच प्रत्येक अनुभव,
प्रत्येक माणूस,
आणि प्रत्येक गोष्ट 
खजिन्यात जपून ठेवावी लागते.

कधी आठवण म्हणून,
कधी शिकवण म्हणून,
तर कधी आधार म्हणून ते सगळं उपयोगी पडतं.

कधीतरी क्षणभर थांबून
त्या खजिन्यात डोकावून बघा —
तिथेच सापडेल हरवलेलं समाधान."
THR ✨

Wednesday, July 9

"तुझ्या प्रेमाचा नशा"✨

"तुझ्या प्रेमाचा नशा"

तुझ्या प्रेमाचा नशा असा चढला,
की मी स्वतःचे भानच हरले...
दरवेळी तू डोळ्यासमोर असावा,
आणि काळजाचे ठोके वाढावे...

तुझ्या स्पर्शात असते एक जादू,
जी वेड लावते मनाला...
तुझ्या मिठीत विसरते जग,
फक्त तूच आठवतो साऱ्या क्षणाला...

तुझ्या नावाने हसते ओठ,
आणि डोळ्यात स्वप्नांची दुनिया सजते...
तुझ्या एका शब्दात मिळते शांतता,
जिची कुठेच सर येत नाही जगते...

प्रत्येक सकाळी तुझ्या विचारांनीच सूर्योदय होतो,
रात्र तुझ्या मिठीत चांदणं भरते...
माझ्या प्रत्येक श्वासात तू सामावलाय,
हे प्रेम... वेळेपेक्षाही जास्त तुझ्यात गुंतून जपले जाते...
THR ✨