Saturday, October 31

माझ्या आजीची वही 11 © विठ्ठला आली आषाडी एकादशी...

विठ्ठला आली आषाडी एकादशी

दिंड्या चालल्या पंढरीसी

सखुबाई पुसे विठ्ठलाशी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा...

भीमा आणि चंद्रभागा नदीभरलीसे गंगा 

अंघोळीला नाही जागा कशी मी येऊ सांगा पांडुरंगा...

सखूबाई बांदली खांबासी कुलूप लागले दारासी,

सखुबाई पुसे विठ्ठलासी कशी मी येऊ सांगा पांडुरंगा...

सासुबाईचा सासरवास,

पती गेले परदेश कशी मी येऊ सांगा पाडूरंगा...

विठ्ठला आली आषाडी एकादशी...


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Wednesday, October 28

माझ्या आजीची वही 10 © विठ्ठल विठ्ठल हाका मारीते वनात...

विठ्ठल विठ्ठल हाका मारीते वनात

हाती टाळ विना उभी तुळशीवनात || 

स्वर्गेच्या वाटेला यम करतील घाण, खरसांग आत्मराजा किती केल पुण्यादान विठ्ठल विठ्ठल...||

स्वर्गेच्या वाटेला यम करतील दशा, खरसांग आत्माराजा किती केल्या एकादशा

विठ्ठल विठ्ठल... ||

स्वर्गेच्या वाटेला आत्मा चालला घाई घाई,

कशाची आई बाई शेवट पुण्य संगे येई विठ्ठल विठ्ठल...||

स्वर्गेच्या वाटेला आत्मा चालला एखला एखला सोबत गुरुचा दाखला

विठ्ठल विठ्ठल...||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Saturday, October 24

माझ्या आजीची वही 9 © सदगुरु महिमा काय वरणू या जगात...

सदगुरु महिमा काय वरणू या जगात

चार दिवस गुप्त होऊन बसले भूमीत ||धृ||

वाल्या कोळीसारखा पापी नाही या जगात,

एक एक मनुष्य मारून खडा टाके रांजनात ||

अशा खड्याचे सात रांजन भरले रानांत,

झाला भुमीवर भार नारद आले धावत ||

अरे अरे वाल्या पाणी येऊदे तुझ्या हृदयात,

येवढे करशील पाप हिस्सा घेईल कोणी त्यात ||

हिस्सा घेईल घरची अस्तूरी प्रेम माझ्यावरत,

घरीजाऊन प्रेमसखेला काय विचारत ||

माझ्या पापाचा हिस्सा घ्यावे त्वरीत,

जो करेल तो भरेल आम्ही नाही जाणत ||

धावत पळत आला वाल्या धरीनारदाचे पाय,

नारद ठेवी मस्तकावरी हात ||

रामनामाचा जप मांडीला या रानात,

वाल्या कोळीचा वाल्मीक झाला महापुराणात ||

सदगुरू महीमा काय वरणु या जगाल,

चार दिवस गुप्त होऊन राहिले भुमित ||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Friday, October 23

माझ्या आजीची वही 8 © माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला...

माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला हा...हा...

खेळू नको नंदलाला

तुझी माझी आहे प्रीती,

लोक तुझ्यावर संशय धरती...

मी आहे मोठ्याची सून, 

तुला माझ्या गळ्याची आन हा...हा...

माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला हा...हा... 

माझ्या अंगणात तुलसी वृंदावन,

तेथे करू नको मातीची घान

माझ्या अंगणात पंढरीनाथ,

विटे वरी उभा कटेवरी हात हा...हा...

माझ्या अंगणात खेळू नको नंदलाला

माझ्या अंगणात खेळू नको रे नंदलाला...


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Wednesday, October 21

माझ्या आजीची वही 7 © जीवन आहे दुपारची सावली...

नका ठेवा अभिमान अंतरी,

जिवन आहे दुपारची सावली ||

रावनाने गर्व केला,शक्ती असून मिळाला धुळीला ||

चांगल्या चांगल्याची मान वाकली खाली 

जीवन आहे दुपारची सावली ||

श्रीरामाचे साहय असूनि, सीता ठेविली तपोवणी

जे लिहीले असेन कपाळी,ते चुकेणा कधीकाळी 

जिवन आहे दुपारची सावली ||

हरीचंद्राने स्वतःला विकून टाकिलें, डोम्याघरी पाणी वाहिले,

पाहा राजाचा बनला भिकारी

अन्नअन्न करत फिरतो दारोदारी

अभिमानाची नशा नाही चांगली

जीवन आहे दुपारची सावली ||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂

Tuesday, October 20

माझ्या आजीची वही 6 © भारताचे निशान आम्ही नाही सोडणार...

झांशीची राणी लक्ष्मीबाई ती एक होती नार

ढाल छातीशी पुत्र पाठीशी कमरेला तलवार |

होऊन गेले शिवाजी राजे गाजविली तलवार |

भारताचे निशान आम्ही नाही सोडणार 

स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार ||

भारत स्वतंत्र झाला इंग्रज - गेले पार

इंग्रजाच्या लाथा खाल्या नाही तुम्हाला लाज

महात्मा गांधी, सुभाषबाबू,  पंडील नेहरू यांचा बोला जयजयकार |

भारताचे निशान आम्ही नाही सोडणार

स्वातंत्र्याचे निशान आम्ही नाही सोडणार ||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏