Monday, October 19

माझ्या आजीची वही 5 © चला जाऊ अयोध्येला...

 चला जाऊ अयोध्येला सुमनवाहू श्रीरामाला ||धृ||

नाही केली तुझी सेवा म्हणून रूससीन का देवा ||

कंठी शोभे श्रीरामाला, पदक शोभे श्री बाळाला

चला जाऊ अयोध्येला सुमनवाहु श्रीरामाला ||1||

कैकई दृष्ट कारण झाली वचन तिने पुरे केले ||

दशरथाने शोक केला रामासाठी प्राण दिला 

चला जाऊ अयोध्येला सुमन वाहु श्रीरामाला ||2||

डाव्या हाती सीतामाई मारूतीचे चित्र पाही 

आनंद झाला मनाला

चला जाऊ अयोध्येला...||3||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂

1 comment: