छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाने माहित करुन घेतलेच पाहिजे.... काल मला रस्त्यावर 4-5 मुले सायकलीला झेंडा लाउन उभे असलेले दिसलेत आणि त्यांच्यात गप्पा चालल्या होत्या. एक म्हणतो की, " माझा झेंडा मोठा", दूसरा म्हणतो की, "माझा झेंडा मोठा", तीसरा म्हणतो "आम्ही रोज ढोल वाजवायची प्रैक्टिस करतो"
मी त्यांच्याकडे गेली आणि विचारले की , " सायकलीला झेंडा का लावला?", तेव्हा त्यांच्यातला एक म्हणतो, "अय दीदी तुला एवढे पण माहित नाही का, की शिवजयंती आहे अस?", मी मुद्दाममच म्हटले की नाही, मग मी पुन्हा त्यांना प्रश्न केला की, कधी असते शिवजयंती तेव्हा त्यातले काही शांत बसले, काही ईकडेतीकड़े पाहत होते, मग काही वेळाने एकाने भरपूरर... विचार करून सांगितले की उद्या आहे(लहान मूल होते). बर, यानंतर मी परत आपले काही बेसिक प्रश्न विचारले शिवजयंती म्हणजे काय, महाराजांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव ,जन्म, राज्यअभिषेक, मुलाचे नाव ????... असे मोजून दहा प्रश्न विचारले, यातील शेवटचा दहावा प्रश्न महत्वाचा होता तो म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत?", ते लहान असल्याकारणाने कदाचित माहितनसनार, मग मी त्यांना दहाही प्रश्नाचे उत्तर समजून सांगितले आणि महाराजांचे विचार काय आहेत हेही सांगितले.
याबरोबर तुम्ही सर्वजन शाळेत जातात का? मराठी लिहिता वाचता येते का?, त्यांच्या उत्तरावरून त्यांना महाराजांची लिखित पुस्तकांची नावे सांगितली आणि यूट्यूबवर कशी माहिती पहायची हे पण सांगितले.
यानंतर त्यांचा निरोप घेताना त्यांनी सांगितले की आम्ही छत्रपति शिवाजी महाराजांचे विचार नक्की फॉलो करू☺️.
THR☺️
No comments:
Post a Comment