Friday, July 29

आनंद...3

आनंद

विचारातील विचार...

 कोणावरही अवलंबुन रहायचे नाही आणि 

दुसर्‍याला आपल्यावरच अवलंबुन रहाण्याची सवय लावायची नाही 

यातच आनंद आहे

THR

आनंद...2

आनंद 

विचारातील विचार...

 जे आपल हक्काच आहे ते आपण कुणाला द्यायच नाही आणि 

जे आपल हक्काच नाही ते आपण घ्यायच नाही

यातच आनंद आहे...

THR

Sunday, July 24

संस्कृती...2

विचारातील विचार...
संस्कृती...2

विसरने नैसर्गिक आहे,
मान्य करने संस्कृति आहे
आणि त्यात सुधार करने प्रगति आहे.

संस्कृती...एका मुलीचे नाव असू शकते तर,
संस्कृती...मानवी, खाद्य, वैदिक, अश्या खूपसार्‍या संस्कृतीचे वर्णन होते तर,
संस्कृती...रूढीपरंपरा च्या नावाखाली चालवलेला बाजार, तर यासाठी आपण मानवी वेषभूषा यावर संस्कृती कश्या प्रकारे पाहिली जाते हे पाहूयात, 
असे कपडे घातले तर ही आपली संस्कृती नाही, तसे कपडे घातले तर ही आपली संस्कृती नाही,
म्हणजे...?
 THR
To be continue...

Saturday, July 23

आनंद...1

आनंद...
विचारातील विचार...

यश म्हणजे काय तर,
 आपल्यामुळे आपल्या आई वडिलांच्या चेहर्‍यावर असणारा आनंद आणि समाधान...
THR

Sunday, July 17

लोक काय म्हणतील...1

विचारातील विचार....
लोक काय म्हणतील...

लोक काय म्हणतील आणि लोक काय म्हणत आहेत... 
याहीपेक्षा मी काय म्हणतो, 
माझे कुटुंब काय म्हणते याला महत्व द्या... लोकांचे काय हो,
ते तर घोड्यावर पन चालु देत नाहीत आणि हत्तीवर पन नाहीत,
मग आपण ठरवायचे आपल्याला कशाने चालायचे म्हणजे काय करायचे ते...
कारण आपण प्रगती करत असताना आपल्याला या वाटेवर भरपुर काटे मिळतील आणि ते आपल्याला पुढे जाण्यास थांबवणार...
कसय आजकाल लोकांचे काय झालय,
आपण केल ते पुण्य आणि दुसर्‍याने केल ते पाप...
THR
To be continue...

Saturday, July 16

काळजी...2

विचारातील विचार
काळजी...2
प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असते,
मग तो पक्षी असो की माणूस...
THR
To be continue...

Thursday, July 14

काळजी...1

विचारातील विचार...
काळजी...1
काळजी घेणारी व्यक्ति असेल ना,
तर आपल्याला त्याचा सहवास हवाहवासा वाटतो
THR
To be continue...

मन 2...

विचारातील विचार...
मन 2...
या मनाने त्या मनाला विचारले,
का? रुसलास माझ्यावर,
का? बोलत नाहीस या मनाशी...

तेव्हा ते मन म्हणते...
प्रेम तर करतो खुप तुझ्यावर,
पण बोलून प्रेम व्यक्त होत नसते,
आपण मनाने जुळलेले,
मग मी कसा रुसणार तुझ्यावर...

पुन्हा या मनाने त्या मनाला विचारले...
पन मला तुझ्याशी बोलायला,
तुझा आवाज ऐकायला खुप आवडते,
तू बोलला नाहीस ना,
तर माझे मन लागत नाही कशातच, 
आणि मग मी नाराज असतो,
माझ्या मनाचे अश्रू थांबत नाहीत,
मग मी काय करावे?...
THR 
To be continue...

Sunday, July 10

संवाद...

 संवाद 

संवाद! संवाद म्हणजे काय तर शब्दांची जुळवाजुळव...अक्षराची जुळवाजुळव...

आठवून केलेला संवाद आणि न आठवता केलेला संवाद...

संवाद हा असाच असतो; आपण सजीव  आणि निर्जीव यांच्याशी संवाद साधत असतो,कधीकधी हा संवाद स्वतःहाशि पन करावा, संवाद साधताना आपण त्यांच्याशी मैत्री करतो मग ती कुणाशीही असो... संवाद हा संवाद असतो 

जसा विचारांना फुलस्टॉप नसतोना तसा संवादालाही नसतो... संवाद केल्याने नात्यातील आपुलकी वाढते आणि दुरावा कमी होतो यामुळे संवाद हा खुप महत्वाचा असतो, संवाद केल्याने मनातील चलबिचल कमी होते, दुःख कमी होतात कारण समुद्रातील तुफाना पेक्षा मनातील वादळ खूप भयंकर असते. संवाद केल्याने आनंदात भर पडते..प्रत्येकाच्या जीवनात असते एखादी व्यक्ति जिच्याशी आपण मनसोक्त संवाद साधू शकतो...

शेवटी संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण,आदान प्रदान...