Showing posts with label मन. Show all posts
Showing posts with label मन. Show all posts

Thursday, October 17

मनातलं...💫

मनातलं…

नुकतीच आई झालेली ती मुलगी,
शारीरिक थकवा, मानसिक गुंतवणूक, बाळाच्या नव्या जगाची जबाबदारी…
या सगळ्यात हरवलेली होती ती.

मन खूप काही सांगू पाहत होतं,
आणि म्हणून ती माहेरी आली – आपल्या आईकडे,
जिच्या मांडीवर डोकं ठेवलं की
सारा त्रास विसरायला व्हायचं…

पण ह्यावेळी वेगळंच घडलं...

ती आईला आपल्या मनातलं दुःख सांगू पाहत होती,
पण तिच्या आईच्या डोळ्यातसुद्धा काही वेगळंच दुःख दाटलेलं होतं.
आईच्या शब्दांमधील आंतरिक वेदना ऐकून
तिच्या स्वतःच्या शब्दांनीच माघार घेतली…

डोळ्यांतून अश्रू वाहू लागले,
न सांगताही खूप काही बोलून गेले…
पण मन मात्र अजूनही तडफडत होतं –
"काय करावं? कुणाशी बोलावं? कोण समजून घेईल?"

तिनं ठरवलं –
"बस, आता स्वतःलाच सावरणं हाच एक मार्ग आहे."
प्रयत्न सुरू झाले,
दररोज स्वतःला समजावत होती –
"सावर, तू आई झाली आहेस आता..."

पण...
ते ‘सावरणं’ तितकं सोपं नव्हतं.
बाहेर शांत दिसणारं चेहरं,
आतल्या कळांनी ढवळून निघालेलं होतं.

आणि मग एक क्षण आला –
ती फक्त भिंतींना, सायलीच्या फुलांना,
आणि आरशातल्या स्वतःला आपलं मन सांगू लागली…

आई बनणं म्हणजे फक्त बाळाला पाजणं, झोपवणं नव्हे,
तर स्वतःला विसरून, नव्याने जन्म घेणं असतं.
पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं –
हे तिला हळूहळू समजू लागलं...

"मनातलं" तिने शेवटी स्वतःच ऐकून घेतलं…
THR✨

Thursday, July 14

मन 2...

विचारातील विचार...
मन 2...
या मनाने त्या मनाला विचारले,
का? रुसलास माझ्यावर,
का? बोलत नाहीस या मनाशी...

तेव्हा ते मन म्हणते...
प्रेम तर करतो खुप तुझ्यावर,
पण बोलून प्रेम व्यक्त होत नसते,
आपण मनाने जुळलेले,
मग मी कसा रुसणार तुझ्यावर...

पुन्हा या मनाने त्या मनाला विचारले...
पन मला तुझ्याशी बोलायला,
तुझा आवाज ऐकायला खुप आवडते,
तू बोलला नाहीस ना,
तर माझे मन लागत नाही कशातच, 
आणि मग मी नाराज असतो,
माझ्या मनाचे अश्रू थांबत नाहीत,
मग मी काय करावे?...
THR 
To be continue...

Wednesday, December 30

मन...1

 मन म्हणजे एक विचारच की,

मन कधी मनाने घडून गेलेल्या घटनांचे पुनार्वलोकन करते आणि भूतकाळात घेऊन जाते,

मन कधी मनाने घडत असलेल्या घटनांचे पुनार्वलोकन करते आणि वर्तमानकाळात आणते,

मन कधी मनाने घडणाऱ्या घटनांचे पुनार्वलोकनाचे आभास करते आणि भविष्यात घेऊन जाते,

मन हे असेच असते...

मन कधी कल्पना करते आणि दुखःत घेऊन जाते, 

कधी कधी मन कल्पना करून समस्याचे निराकरण करते आणि आनंदात घेऊन जाते

मन हे असेच असते हो...

THR

To be continue...