Monday, June 28

निसर्ग 3

पाऊस आला की तेव्हा मस्त वाटते जेव्हा तो शांत,उदास निसर्गाला मनमोहक, हिरवेगार करून जातो, त्याच्या प्रेमात पाडतो आणि तेव्हा बालकवींची कविता आठवते...
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे...










Friday, April 30

आस...

उगवलेल्या सूर्याला मावळन्याची आस

मावळलेल्या सूर्याला उगवन्याची आस,

पाहिलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्याची आस

पूर्ण केलेल्या स्वप्नाला पाहन्याची आस







THR✨

Friday, March 19

माझे पुस्तक वाचन

 माझे पुस्तक वाचन =


मला अनेक जण विचारतात की तु वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन कश्याप्रकारे करतो ??वाचलेलं ध्यानात कसे ठेवतो ??तुझ्या वाचनाचा वेग किती ??एका दिवसांत किती पृष्ठ वाचून समाप्त करतो ??वाचून त्याचे विश्लेषण कसे करतो ?? पुस्तक वाचताना नोट्स काढतो का ?? अभ्यासातून वेळ कसा मिळतो ?? पुस्तक वाचल्यानंतर काय होते किंवा त्याचे फायदे काय ?? वगैरे इत्यादी काही प्रश्नांची उत्तरे मी या लेखात द्यायचं प्रयत्न करतो...


मी पुस्तके का व कशासाठी वाचतो ??


१)जसे गाडी पेट्रोल, मोबाईल चार्जिंग,मनुष्य अन्न/पाणी/ हवे शिवाय चालत नाही त्याच प्रकारे माझा मेंदू वाचनाशिवाय चालत नाही यामुळे मेंदूला चालना देण्यासाठी मी वाचत असतो.. 

२)वेगवेगळ्या लेखकांचे भिन्न भिन्न विषय/मुद्द्यांवर त्यांचे अनुभव/विचार जाणून घेऊन स्वतःच एक मत बनवण्यासाठी मी वाचत असतो. 

३)एका जागी बसूनच जग फिरण्यासाठी मी वाचत असतो, 

४)मनातील/मेंदूतील घाण विचार बाहेर पडून चांगले विचार मेंदूत घर करून बसावे यासाठी मी वाचत असतो, 

५)जगात/देशात वाढत चाललेल्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मी वाचत असतो.

६)जगात जेवढे यशस्वी व्यक्ती आहेत ते एक चांगले वाचक आहे यामुळे मी वाचत असतो.

७)वाचनाने काहीही नुकसान होत नाही यामुळे मी वाचत असतो किंवा तणावातून मुक्त होण्यासाठी मी वाचत असतो. 

८)इतरांच्या अनुभवातून/चुकांतून शिकण्यासाठी मी वाचत असतो किंवा शब्दसंग्रह भाषाकोष वाढवण्यासाठी मी वाचत असतो.

९)माझे व्यक्तिमत्त्व विकासाच्या साठी मी वाचत असतो व मनाच्या शांतीसाठी मी वाचत असतो.

१०)आयुष्य बदलण्यासाठी व घडवण्यासाठी मी वाचत असतो व यासोबत आत्मविश्वास वाढवण्यासाठी मी वाचत असतो.

११)एखाद्या विषयावर सखोल ज्ञान घेण्यासाठी व जिज्ञासापुतर्ती करण्यासाठी मी वाचत असतो..

१२)स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे यासाठी व विपुल प्रमाणात चांगले लेखन करता यावे म्हणून मी वाचत असतो.

१३)भविष्यात एक चांगला अधिकारी बनण्यासाठी मी वाचत असतो व शेवटी पुस्तके हेच माझे मित्र आहेत त्यांच्याबरोबर नेहमी बोलण्यासाठी मी त्यांना वाचत असतो..


मी वाचन कसे करतो ??


तुम्ही किती वेळा वाचता यापेक्षा कशाप्रकारे वाचतो हे महत्वाचे ठरते.लिहलेलं वाचून समजून घेण्यावर जास्त भर द्यायला हवा.


१)मी रोज एक पुस्तकाचे ४०-५० पृष्ठ न चुकता वाचत असतो यामुळे ३००-४०० पृष्ठांची कादंबरी सुद्धा मी ६-७ दिवसांत वाचून पूर्ण करु शकतो(काही अपवाद वगळता) एखादे पुस्तक जर खूपच मनात घर करून गेले तर त्या पुस्तकाचे रोज १५० पृष्ठ मी वाचन करतो आणि ते फक्त वाचतच नाही तर त्यावर विचार सुद्धा करत असतो व ते समजून घेण्यावर जास्त भर देतो..

२)एखादा मजकूर न समजल्यावर तो पुन्हा रिपीट वाचत असतो. 

३)अवघड/कठीण शब्द/नाव अंडरलाईन करत असतो 

४)वाचन मी नेहमी शांत मनाने व मनात चाललेले सारे विचार बाजूला काढून वाचत असतो.

५)समोर/टीव्ही सुरू असल्यावर अथवा गोंगाटामध्ये मी कधीही वाचत नाही मी नेहमी शांत जागेत वाचन करत असतो.

६)पुस्तकातील फक्त काहीच मजकूर मी जोरजोरात वाचत असतो व बाकी मूक वाचनालाच प्राधान्य देतो. 

७)मी एकाच जागी बसून कधीही वाचन करत नसून बसून/झोपून/चालत-फिरत वाचत असतो.

८) पुस्तकातील मुख्य पात्राच्या ठिकाणी स्वत:ला ठेऊन मी वाचन करत असतो (उदाहरण :रावण कादंबरी वाचत असताना मी स्वतःला रावण समजून वाचत होतो किंवा प्रतिपश्चन्द्र कादंबरी वाचत असताना स्वत:ला रवि समजून वाचत होतो)

९) पुस्तक वाचत असताना मी फक्त त्याच पुस्तकावर लक्ष्य केंद्रित करून वाचत असतो.

१०)वाचन समाप्त झाल्यावर मला त्यातून काय शिकायला मिळाले याबद्दल मी विचार करत असतो,

११)फक्त वाचायचं आहे किंवा पुस्तक वाचून संपवायचं आहे म्हणून मी कधीही वाचत नाही.

१२)पुस्तक वाचन झाल्यावर त्या विषयावर गुगल करतो व काही माहिती पुन्हा वाचतो,समीक्षण वाचतो आणि मला जे समजलं/उमजलं ते सरळ सरळ लिहून काढतो.. 

१३)मी बाचत असताना ओळीवर बोट ठेऊन कधीही वाचत नसतो याने वाचनाचं वेग खूप कमी होतो. याप्रमाणे मी वाचन करत असतो आणि ते वाचलेलं माझ्या लक्षात सुद्धा राहते..


*वाचनाचे फायदे काय किंवा पुस्तक वाचन केल्यानंतर....*


१)प्रेम आणि वासना यामधील फरक समजतो...

२)गरीब सुद्धा श्रीमंत दिसु लागतो.. ३)समाजामध्ये किती दुःख आहे हे समजते...

४)कोणत्या माणसांशी कसे वागावे हे समजू लागते..

५)प्राण्यांशी व निसर्गाशी आपुलकी निर्माण होते.. 

६)समाजातील भयानक रितीरिवाज,अंधश्रद्धा,रुढीपरंपरा, ढोंग समजू लागते...

७)महापुरुष नेमके कोणास म्हणावे हे समजते...

८)पैसा हाच सर्व नाही या गोष्टीवर आपला विश्वास बसतो... 

९)विश्वात आपले अस्तित्व किती किरकोळ आहे हे समजते..

१०)आई वडिलांची खरी किंमत कळते.. ११)कोणी आपल्याला कितीही वाईट बोलू प्रेमानेच बोलावे हे समजून चुकते..

१२)आपल्या देशासाठी किती थोरांनी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे हे समजते..

१३)किती इतिहासातील गोष्टी आपल्या पासून लपवल्या गेल्या आहे हे समजते..

१४)प्रत्येक महिलांची नेहमी इज्जत करावी हे समजते.. 

१५)आयुष्यात पास होणे फक्त हेच जीवनाचे उद्देश्य नाही.. किंवा एकाद्या परीक्षेत नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार सुद्धा मनात येत

नाही..

१६)आज जी व्यक्ती आपल्याला उच्च शिखरावर दिसते त्यांनी त्या शिखरावर पोहचण्यासाठी किती मेहनत केली होती हे समजते..

१७)विश्व किती अफाट आहे याची जाणीव होते.. 

१८)धर्म,जाती हे सर्व ढोंग असून माणुसकी हीच सर्वोपरी आहे याची समज येते...

१९)गौतम बुद्धांनी सांगितलेला "अत दीप भव" हा मार्ग समजतो.. हजरत मुहम्मद पैगंबर यांचा खरा शांतीचा मार्ग देणारा इस्लाम समजतो.. २०)माणसांनी निसर्गाचा कशाप्रकारे विनाश केला आहे हे समजते.. २१)गुन्हेगारा मध्ये सुद्धा माणूस दिसू लागते व त्याची मजबुरी समजू लागते..

२२)कोणालाही उपदेश देण्याच्या पहिले आपण काय आहोत है 

२३)शिवरायांच्या स्वप्नातला हिंदवी स्वराज्य म्हणजे नेमकं काय हे समजायला लागते..

समजते..

२४)बाबासाहेबांनी सांगितलेला मूलमंत्र शिका संघटित व्हा आणि संघर्ष करायाचा अर्थ कळतो.

२५)डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम सरांच्या स्वप्नातील भारत म्हणजे काय हे समजते.

२६)शहीद भगत सिंह यांच्या क्रांतीचा अर्थ कळतो..

२७)मंदिर-मस्जिद या गोष्टी मानवासाठी एवढ्या उपयोगाच्या नसून हॉस्पिटल,शाळा इत्यादीच मानवाच्या मूलभूत गरजा आहे हे समजते.. 

२८)कोणाकडून चुकी झाली असल्यावर त्याला माफ करण्याची समज येते.. 

२९)देशभक्तीचा नेमका अर्थ काय हे समजतो..

३०)विश्वाला,समाजाला बघण्याची एक नवीन दृष्टी मिळते...

३१)हिंदू मुस्लिम म्हणून न जगता माणूस म्हणून कसे जगावे समजते.. 

३२)समाजात तेढ निर्माण करणार्या नेत्यांचा असली चेहरा समजतो.. ३३)शेतकरयांचे ,कामगारांचे दुःख समजते

३४)बालविवाह,लहान मुलांचे लैंगिक शोषण,कुपोषण,बलात्कार,बंधुवा मजदूरी इत्यादी आपल्या समाजाला लागलेली कीड आहे हे समजते...

३५)पुस्तक वाचनाचे फायदे कळू लागतात... ३६)आत्मविश्वास निर्माण होतो.

३७)विश्वाला/समाजाला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो..


लेखक जेव्हा कोणत्याही एका विषयावर/मुद्द्यांवर/ व्यक्तींवर ( उदाहरण :-ऐतिहासिक,चरित्र,भौगोलिक, राजकीय अथवा) पुस्तक/ कादंबरी लिहायला घेतो तेव्हा तो त्या विषयासंबंधीत अनेक पुस्तके/ग्रंथ/बखरी खंगाळतो त्याचा अभ्यास व संशोधन करतो,नोट्स काढतो,अनेक तज्ञांना भेटतो त्यांच्याकडून माहिती घेतो,पुरावे गोळा करतो,या विषयावर रात्रंदिवस मेहनत करतो व एकंदरीत आपल्या आयुष्यातील काही महत्वपूर्ण वर्षे देऊन तो आपल्या स्वतःच्या अनुभवाने/ पात्रता पुस्तक वाचकांसमोर ठेवतो...


आता जेव्हा आपण त्याविषयावर पुस्तक वाचायला घेतो तेव्हा आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही कारण त्यावर मेहनत ही लेखकाने अगोदरच घेतलेली असते म्हणून आपल्याला फक्त हे पुस्तक वाचूनच ज्ञान/अनुभव/माहिती मिळून जाते..लेखकाने पुस्तक लिखाणासाठी केलेली मेहनत व अनेक वर्षेदेऊन अभ्यास/संशोधन करून मिळवलेली माहिती/अनुभव आपल्याला फक्त काही दिवसाच्या वाचनानेच मिळून जाते.. आणि हीच पुस्तकांची खरी ताकद आहे...पुस्तक वाचनाने आपण विचार करायला शिकतो, आपली इच्छाशक्ती मजबूत होते,आत्मविश्वास येतो,पुस्तके आपल्याला कधीही एकटे पडूच देत नाही ,वाचनाने आपले विचार प्रगल्भ होतात, आपल्याला अनेक विषयांवर शिकायला मिळते,आपण इतरांच्यापेक्षा वेगळे वागतो आणि नेमकं जगायचं कसे हे आपल्याला शिकायला मिळते....

©कॉपी पेस्ट©


Wednesday, March 10

Monday, February 22

Online Education System

 Online education system is a part of today's life and it has been done. It depends on us how to look at it.  Looking at the negative way, we are reading this essay right now, so I did not type it online and what does it mean that, in general it is the health problem and second is the range problem of the internet and the biggest problem is the internet problem to the students,Teachers and parents too. Now we will see positive results, due to online learning system we are getting easier to do different courses. A student takes the same topic online in a different way.The teacher cannot go to every student's home, but every parents can become a teacher for the future of his child.Nowadays we are looking at parents for spending money on the education of children means wasted for them and parents who do not think about their child's future.If you should complete basic. Children are small, they are of their learning age, but you can give children mobiles to play games, but if the school teacher is teaching something online then you do not give and this is true.  For this, parents have to be awakened.  And the biggest problem is the internet does not run, so for this, the specific website, channels, apps, education, their speed should be increased and charges should be reduced.If the country is to be a development country then they should come first in basic.The child is only going to one class to another class.There are some dreams in life.

छत्रपति शिवाजी महाराज

 छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रत्येकाने माहित करुन घेतलेच पाहिजे....  काल मला रस्त्यावर 4-5 मुले सायकलीला झेंडा लाउन उभे असलेले दिसलेत आणि त्यांच्यात गप्पा चालल्या होत्या. एक म्हणतो की, " माझा झेंडा मोठा", दूसरा म्हणतो की, "माझा झेंडा मोठा", तीसरा म्हणतो "आम्ही रोज ढोल वाजवायची प्रैक्टिस करतो"

मी त्यांच्याकडे गेली आणि विचारले की , " सायकलीला झेंडा का लावला?", तेव्हा त्यांच्यातला एक म्हणतो, "अय दीदी तुला एवढे पण माहित नाही का, की शिवजयंती आहे अस?", मी मुद्दाममच म्हटले की नाही, मग मी पुन्हा त्यांना प्रश्न केला की, कधी असते शिवजयंती तेव्हा त्यातले काही शांत बसले, काही ईकडेतीकड़े पाहत होते, मग काही वेळाने एकाने भरपूरर... विचार करून सांगितले की उद्या आहे(लहान मूल होते). बर, यानंतर मी परत आपले काही बेसिक प्रश्न विचारले शिवजयंती म्हणजे काय, महाराजांचे नाव, आईचे नाव, वडिलांचे नाव ,जन्म, राज्यअभिषेक, मुलाचे नाव ????... असे मोजून दहा प्रश्न विचारले, यातील शेवटचा दहावा प्रश्न महत्वाचा होता तो म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार काय आहेत?", ते लहान असल्याकारणाने कदाचित माहितनसनार, मग मी त्यांना दहाही प्रश्नाचे उत्तर  समजून सांगितले आणि महाराजांचे विचार काय आहेत हेही सांगितले. 

याबरोबर तुम्ही सर्वजन शाळेत जातात का? मराठी लिहिता वाचता येते का?, त्यांच्या उत्तरावरून त्यांना महाराजांची लिखित पुस्तकांची नावे सांगितली आणि यूट्यूबवर कशी माहिती पहायची हे पण सांगितले.

यानंतर त्यांचा निरोप घेताना त्यांनी सांगितले की आम्ही छत्रपति शिवाजी महाराजांचे विचार नक्की फॉलो करू☺️.

THR☺️