Thursday, July 14

मन 2...

विचारातील विचार...
मन 2...
या मनाने त्या मनाला विचारले,
का? रुसलास माझ्यावर,
का? बोलत नाहीस या मनाशी...

तेव्हा ते मन म्हणते...
प्रेम तर करतो खुप तुझ्यावर,
पण बोलून प्रेम व्यक्त होत नसते,
आपण मनाने जुळलेले,
मग मी कसा रुसणार तुझ्यावर...

पुन्हा या मनाने त्या मनाला विचारले...
पन मला तुझ्याशी बोलायला,
तुझा आवाज ऐकायला खुप आवडते,
तू बोलला नाहीस ना,
तर माझे मन लागत नाही कशातच, 
आणि मग मी नाराज असतो,
माझ्या मनाचे अश्रू थांबत नाहीत,
मग मी काय करावे?...
THR 
To be continue...

Sunday, July 10

संवाद...

 संवाद 

संवाद! संवाद म्हणजे काय तर शब्दांची जुळवाजुळव...अक्षराची जुळवाजुळव...

आठवून केलेला संवाद आणि न आठवता केलेला संवाद...

संवाद हा असाच असतो; आपण सजीव  आणि निर्जीव यांच्याशी संवाद साधत असतो,कधीकधी हा संवाद स्वतःहाशि पन करावा, संवाद साधताना आपण त्यांच्याशी मैत्री करतो मग ती कुणाशीही असो... संवाद हा संवाद असतो 

जसा विचारांना फुलस्टॉप नसतोना तसा संवादालाही नसतो... संवाद केल्याने नात्यातील आपुलकी वाढते आणि दुरावा कमी होतो यामुळे संवाद हा खुप महत्वाचा असतो, संवाद केल्याने मनातील चलबिचल कमी होते, दुःख कमी होतात कारण समुद्रातील तुफाना पेक्षा मनातील वादळ खूप भयंकर असते. संवाद केल्याने आनंदात भर पडते..प्रत्येकाच्या जीवनात असते एखादी व्यक्ति जिच्याशी आपण मनसोक्त संवाद साधू शकतो...

शेवटी संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण,आदान प्रदान... 

Sunday, July 18

निसर्ग 4

# निसर्गाचे सौंदर्य आणि माणसाचे सौंदर्य सारखेच असते... 

फरक एकच, तो म्हणजे आपल्या पाहण्याचा दृष्टिकोन 




# पावसाची सरी येताच निसर्गाने पांघरला 
हिरवाशालू नवीन नवरीवाणी..🌳🏞

# श्रावणसरी आल्या की..

फुलांना नवजीवन देऊन जातात 😇🌺🥀🌹🌻🌼🌷⚘🌱🪴🌳🌴☘🌵🌾🌿🍀💐










Wednesday, June 30

प्रेमाचा रंग TP

जरी इंद्रधनुचे रंग,प्रेमाने माझ्यावर भाळले

जरी प्रेमाचा रंग असला गुलाबी लाल,

तरी आपल्या प्रेमाचा रंग पिस्ता आहे आणि असणार PisTa