Friday, January 19

विचारातील विचार... ✨📝

 विचारांच्या वाटेवर... ✨📝


विचारांच्या वाटेवर,

अनेक विचार नकळत मनाच्या दारात येऊन थांबतात...


अर्णवा… त्या अथांग सागरासारखे विचार –

कधी शांत, कधी वादळासारखे…


याच विचारांच्या लाटांतून

हळूहळू कवितेच्या ओळी जन्म घेतात...


शब्द हे सहज येत नाहीत,

ते विचारांच्या खोल तळातून

हळुवारपणे वर येतात –

कधी श्वासासारखे, कधी अश्रूसारखे…

THR✨


Friday, October 6

मन...3

    नेहमी प्रमाणे काम आटपून ती रूम मध्ये आली... झोपायला नेहमी प्रमाणे जवळ जवळ ११:३० झालेच होते... तिने एक नजर त्याच्यावर टाकली तर तो फोन घेऊन बसला होता... तिने उशी नीट केली आणि पाठ बेडवर ठेकवली आणि डोळे बंद केले... तेवढ्यात तिला तिच्या कपाळावर त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिला जाणवला.... आता पर्यंत ओढलेल्या त्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य उमटलं... तिच्या कानाशी अगदी तिलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात तो बोलतो " *दमलीस का ग?* " तिने हलकं हसून नकारार्थी मान हलवली आणि हळूच नाही बोलली... तिचे ओठ जरी खोट बोलत असले तरी तिचे डोळे खर बोलत होते... त्याने तिला त्याच्या कुशीत ओढल... आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केलं..... तीही त्याच्या मिठीत विसावली आणि मनात विचार येऊन गेला..." कसं असतं ना हे वेड *मन* ... साध्यासा २ शब्दाने सुखावून गेले... कोण म्हणत सुखी राहायला श्रीमंती गरजेची आहे... आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचे *प्रेमाचे* २ शब्द ही पुरे असतात...ह्या थकलेल्या मनावर हळुवार फुंकर घालायला... मग पुन्हा तयार होत... ते उद्यासाठी" .... ती विचार करत...त्याच्या मिठीत झोपी गेली...

Sunday, June 11

आदर...💫💫

🪞 "आपण स्वतःला दिलेल्या सन्मानावरच

आपला आत्मसन्मान उभा असतो –

दुसऱ्यांच्या नजरेत नव्हे,

तर स्वतःच्या नजरेत मोठं दिसणं गरजेचं!"

THR✨

Wednesday, May 10

✨ "श्रद्धा आणि अंधश्रद्धा..." 🕯️🪔

"श्रद्धा आणि अंधश्रद्धा..." 🕯️🪔

 श्रद्धेची गोडी वाढवण्यासाठी,

कधीकधी अंधश्रद्धेशी सांगड घालावी लागते...

THR✨

Sunday, April 16

आनंद...4

दुसर्‍याच्या सांगण्यावरून नात्यांनमध्ये
कधीच गैरसमज करुन घ्यायचा नाही,
यातच आनंद आहे;
आपल्याला आपल्या नात्यांवर विश्वास असला पाहीजे, 
की आपली नाती अस करू शकतात का? 
असा विचार करू शकतात का?
यातच आनंद आहे 
THR

Wednesday, August 3

आदर...1

आदर...
विचारातील विचार...
आपण आपल्या व्यक्तींचा आदर ठेवला तर दुसरेही ठेवतील...
THR