Tuesday, October 1

जिवन...

उमलनं आणि फूलनं
यात बरेच अंतर असते
उमलनं अगदी स्वाभाविक आहे
फूलनं त्यानंतरच आहे

Sunday, September 29

☺️आठवण☹️

☺️पावसाची सर आली की,
त्याची आठवण आपल्याला असेल
आपली आठवण त्याला असेल,
या साऱ्या आठवणींच एक रान वसेल,
मागे वळून पाहता
आसवांच्या सागरातून
आनंदाचे असु दिसेल
☹️पावसाची सर आली की,
त्याची आठवण आपल्याला असेल
आपली आठवण त्याला असेल,
या साऱ्या आठवणींच एक रान वसेल,
मागे वळून पाहता
आसवांच्या सागरातून
दुःखाचे असु दिसेल
THR 🙂

Saturday, September 28

स्री इतिहास बदलला, नाही,घडला.

इतिहास लिहायला गेले की, एका पानात ही होतो आणि लिहायला गेले की पाने व वेळ ही कमी पडतात. इतिहास घडवता येतो,इतिहास बदलता येतो हे ही खरे आणि इतिहास बदलता येत नाही हे ही खरे.
       याचेच उदाहरण स्री-शिक्षण, स्री-शिक्षणाचा इतिहास कसा घडला हे पाहू, 18 व्या-19 व्या शतकात चाललेल्या पुराणमतवादी,मनुस्मृतिवादी,सनातनवादी यांनी त्यांच्या पौराणीकतेचा परंपरागत चालत असलेल्या रूढिचे दाखले देऊन स्री-शिक्षणाला विरोध केला. फक्त स्री-शिक्षणच नव्हे तर बालविवाह, जातिभेद, विधवा पुनर्विवाह विरोध,स्री शोषण,घरातील उंबरठयातील स्री अश्या प्रकारच्या विचारांना पाठपुरावा केला,परन्तु इतिहास घडवला तो सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,पंडिता रमाबाई,डॉ.आनंदिबाई जोशी,अन्नपूर्णाबाई भंडारकर आदि. स्रीयांनी घडवला.त्यांना पाठिंबा देणारे त्यांचे सारथी महात्मा जोतिबा फुले,न्यायमूर्ति महादेव रानडे,लोकहितवादी,सार्वजनिक काका,भांडारकर आदि.समाजसुधारक. हे महान व्यक्ति पुन्हा होने नाही, हा इतिहास आपण बदलू शकत नाही याचे उदाहरण.
       आता  इतिहास कसा बदलला हे पाहू,म्हणजेच इतिहासाच्या वेग वेगळ्या टप्यावर इतिहास कसा बदलत गेला.प्राचीन इतिहासात वेग वेगळ्या टप्यावर मातृप्रधान संस्कृति होती.वैदिक काळात पितृसत्ताक संस्कृति होती परन्तु स्रियाना समानता मिळे,बालविवाह, सतीप्रथा, याला बंदी होती व राजकीय,शिक्षणाचा हक्क होता.
उत्तर वैदिक काळात वर्ण आले आणि स्रियानचे महत्व कमी कमी होत गेले.जस जशी इतिहासाची पाने पालटली जात होती तस तशी स्रियांनचे महत्व कमी होत गेले,त्यांना त्यांच्या हक्कापासून दूर नेत गेले.मद्ययुगीन इतिहासाचा कालखंड असाच खाली वर होत गेला. 18 व्या शतकात स्रियांन विषयिचे महत्व,त्यांचे शिक्षण,हक्क यांची ज्योत हळू हळू जळत होती. असे म्हणतात, "शिक्षण हे वाघिनीचे दूध आहे,ते एकदा घेतले तर गुर्रगुर्रल्या शिवाय राहत नाही" आणि आतापर्यंतच्या इतिहासात असे बदल झाले की आजची स्री ही कोणत्या शिखरावर पोहचलि हे वेगळे सांगने नाही ,असा बदलला इतिहास.
      आज आपण 21व्या शतकात आहोत आजची स्री शिकुन तिला तिच्या हक्कानची जाणीव झाली आहे आणि भारता सारख्या लोकशाही देशात स्रियानविषयी काही योजना,कायदे केलेले आहेत,परन्तु रोजच्या बातम्या वाचल्या की ,दहापैकी एक बातमी तिच्या कर्तुत्वाचे गुण गाणारे आणि 9 बातम्या तिच्यावर होणाऱ्या अन्यायाविषयी. 18-19 व्या शतकात जो समाजसुधारकानी जो स्री शिक्षणाचा खटाटोप,संघर्ष केला तो अजूनही काही प्रमाणात काही लोकांपर्यंत पोहचला नाही.
इतिहासाची अजुन पाने चाचपळली कि आपल्याला त्यांनी केलेल्या कार्याची,त्यांचा कर्तुत्वाची जाणीव होते, या त्यांच्या कार्याला सलाम.

🙂THR🙂

Saturday, September 7

श्री गणेशाय नमः

🙏श्री गणेशाय नमः🙏
पूर्ण वाचा...☺️
गणपती बाप्पा आपल्या आईचा(पार्वती)निरोप👋घेतात,
"आई चल निघतो मी...येतो परत दहा दिवसांनी,तस काही भक्त मला 10 दिवस काही 5 तर काही दीड दिवस बोलावतात...आता तर मज्जाच आहे आमची,माझे भक्त दरवर्षी या दिवसाची किती आतुरतेने🙇वाट पाहतात, तुला मी शब्दात सांगू शकत नाही, त्यांची भक्ति भाव चैतन्य पाहुन खुप🙂छान वाटते त्यात तर त्यात माझे आवडते मोदक मला भर भरून मिळतात, चल निघतो"
"मुषकराव काढ़ा आपली🏍️स्वारी🏍️ धरतीवर"🌍
"हो महाराज"
स्वारी निघाली
"अरे ! इतके धुके🌫️धुके काय दिसत आहेत, आपली पृथ्वी/धरती🌏 माता कुठे आहे आणि हा कचरा कसला...मूषक सांभालून हं आणि हा आवाज🎼कशाचा इतका"
"महाराज आपल्या  भक्ताचाच असेल,आपल्या भक्तित रमलेले"
"अरे हो पण व्यवस्तित👂येकु येत नाही"
"अहो महाराज आपण पृथिच्या बाहेर आहोत अजुन...महाराज! महाराज ती पहा पृथ्वी🌐माता आली"
"प्रणाम गणेशा🙏प्रणाम मूषक"
"प्रणाम माते🙏अग पण तू इतकी🌐त्रासलेली का?"
"मला क्षमा🙏करा गणेशा, मी तुम्हाला काही सांगन्याच्या अवस्तेथ नाही"
"का माते?"
"मला क्षमा करा, परन्तु तुम्ही स्वतः धरतिवर उतरून पाहून 👀घ्या"
गणपती बाप्पाची स्वारी🏍️पुढे निघाली
" मूषक, पृथ्वीच्या उत्तर🌧️दक्षिण भागात बर्फाचे पाणी होताना दिसत आहे, मधील भागात🌤️पाणीच नाही आणि हिरवळ🌳तर दिसेनासी झाली"
"महाराज हा सर्व🌁प्रदूषनाचा परिणाम आहे...चला जमिनीवर उतरु".
गणेशाची स्वारी जमिनीवर उतरली.
रोड़वर सिग्नल🚥लागलय पन लोक सिग्नल🚦तोडून बाप्पाची मूर्ति घेऊन चालले.
मंडळाची मूर्ति घेऊन जात आहेत,पण🚧ट्राफिक जाम झलिय, कुणाला शाळेत जायचय,कुणाला ऑफिसला,कुणाल हॉस्पिटल अश्या वेग वेगळ्या आपापल्या कामला जायचय
गणपती बप्पाने एका भक्ताला विचारले,
"अरे भक्ता थांब"
"कोन तुम्ही,आधीच उशीर झालाय"
"उशीर!उशीर कसला, मी तर आताच आलोय,चल जाऊया आपल्या घरी"
"ओ कोंन तुम्ही आणि आपल्या घरी काय माझ घर आहे ते"
"मलाच घेऊन चाललाय ना तू,मग, ह्या मूर्तितला मीच"
"तुम्हाला बसवायल वेडा आहे का...चला निघा ईथुन"
त्या व्यक्ति ची पन्ति"अहो त्या मोदक च्या दुकाना जवळ गाड़ी थांबवा,10 दिवसाचे मोदक आताच घेऊन टाकू आणि बाजुलाच हरळी की दूर्वा काय ते आताच घेऊ पुन्हा वेळ⏳कुणाला आहे"
हा संवाद गणपति बाप्पाने यैकला.
एका ठिकाणी काही लोक गप्पा मारत आहेत,"बर झाल आज गणेश चतुर्थी आहे" "का हो?" "आज शुक्रवार आणि उद्या शनिवार रविवार सुट्टी,मग काय फिरायला🛤️जायचा बेत आहे" "गणपति नाही बसवायच?" "सोसायटी चा बसलाय की,आणि तसहि सोसायटी ला गणपति वर्गणी 5000💸एकदाची देऊन टाकली,आता आपल काम संपल".
तो संवाद यैकुन तिथुन पुढे गेले गणपति बाप्पा
मंडलांचा गणपति बसन्याची तयारी चालू आहे, तेथे मोठ मोठे dj 📣लावलेत आणि चित्रपटाची गाणी चालू आहेत (गणपति ची नाही बर).
"मूषक हे कोणते गाणे चालू आहे,माझे तर नाही आणि कोणत्या देवाचे ही नाही"
"आजच्या युगातील गाणी🎵🎶🎤आहेत"
तेथेच काही अंतरावर बसलेले मूल बोलत होती,
"आमची परीक्षा📝आहे आता आणि ह्या dj च्या आवाजाने अभ्यास पण होत नाही"
"आमच्या शाळेत गणपति बसवलाय तर आम्हाला काही दिवस सुट्टी काहि दिवस शाळा,मस्तच आहै"
"का ?"
"कार्यक्रम ठेवतात शाळेत कधी भंडारा कधी भाषणे आणि शाळेच्या बाजूला अजुन दूसरा गणपति बसवाला आहे,त्याचा आवाज तर दिवसभर असतो"
"अरे पण शिकवण मागे पडेल त्याच काय"
"त्याच टेंशन नाही ट्यूशन मधे शीकुन घेतो आम्ही"
"मला तर शाळेपेक्षा ट्यूशन मधेच जावस वाटत,आमचे शाळेचे सर एवढे छान शिकवत नाहीत"
"अरे तुमच्या शाळेतल्या सरांकड़े मि ट्यूशन लावली आहे,किती छान शिकवतात ते"
"अरे हो हाच तर फरक आहे ट्यूशन आणी शाळेचा"
"ते ठीक आहे रे शाळेत जा,ट्यूशन ला जा मग आभ्यासाला वेळ मिळत नाही, आणि त्यात ह्या dj चा आवाज"
"आमच्या घरी तर पेशंट🛌आहे"
हाही प्रसंग गणपति बाप्पाने यैकला
"महाराज ते पहा किती छान सजवल तुम्हाला"
"अरे हो मूषक पण... पण हे झाड़े🙅🌲तोडून,प्लास्टिक चा वापर करून ज्याने🌁प्रदूषण होते...सगळी कड़े हवा🌫️पानी💧आवाज📣यांचे प्रदूषण होत आहे,या🌍पृथ्वी🌐चा नाश होत आहे"
"मुषक मला माझा भक्त असा हवा जो,
पर्यावरण🍀पूरक मुर्ति बसवेल, सजावटही पर्यावरण पुरक करेल,आवाज हा दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढा असावा त्या गाण्याचा आनंद🕺💃लुटता यावा आणि मुळात बलजबरिने गोळा केलेले💸❎वर्गणी अजिबात नको, Eco Friendly ने माझी स्थापन केली तरच मला माझ्या भक्ताची खरी☑️भक्ति दिसेल, त्यांच्यात मला भक्ति भाव चैतन्य हव,मला माझ्या भक्ताचा friend🤝 बनायच आहे hater🤜🤛नाही"
"चल मूषक शोधुया👁️आपल्या खऱ्या भक्ताला"

कुणाला वाईट वाटले तर माफ करा🙏

(पुढील भागात...)

🙂THR🙂

Wednesday, August 21

जिंदगी/सपने

जिंदगी☺️

जिंदगी में है कुछ सपने,करने है वह पूरे,
रुकना नही थकना नही, जब तक मिलती नही मंजिल

की है दोस्ती अपने किताबोसे, देंगे राह अपनी मंजिल की

जो सपना देखा जिंदगी में ओ पाना है, मतलब पाना ही है
ये जिद है मेरी, या मेरा अट्टहास

कुछ करना है, खुद को साबित करना है खुदसे

इस जीवन मे आने का लक्ष्य सफल करना है

एक दिन जरूर आएगा, इसी सपने को करूँगी जरूर पूरा, ये मेरा खुद पर खुद का भरोसा

   यही है मेरी मेरे जन्मदिन की शुभकामना खुद से 20 ऑगस्ट
         
       ☺️Life ☺️
There are some dreams in life, to be fulfilled,
Do not stop, do not get tired, until you get to the destination,

That friendship is in its books, will give way to its destination,

What you dream is to get it in life, it means to get
This is my insistence, or my cachinnation,

Something has to be done, we have to prove ourselves,

The goal of coming into this life is to succeed,

One day will definitely come, I will definitely fulfill this dream, this is my confidence in myself,

This is my birthday to myself

(Google translate)

🙂THR🙂

Monday, August 5

शाळेतिल आठवणी👍 बाप ...