ऊना ऊना चहा घ्यावे गोविंदा
वीनविते तुला बाळ मुकुंदा || ||
त्रिगुणी चूल पंचरतन
सत्वाचे भांडे दिले ठेवून,
काम क्रोधाचे सरपण लाविले
पाणी नेमाचे आंदण ठेविते,
राम नामे नामाची चहा टाकीते
भक्तीची साखर आत सोडीत,
प्रेमाची उकळी आली आतून
वैराग्य दुध दिले सोडून,
आत्मा हा कप बुद्धीची बशी
पांडूरंगाची होईल दासी,
वैराग्य पातळ बहुमोल आला
आनंद झाला आत्मारामाला,
ऊना ऊना चहा घ्यावे गोविंदा
वीनविते तुला बाळ मुकुंदा || ||
गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर
पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव
हल्ली मुक्काम औरंगाबाद
🙏🏻🙂THR 🙂🙏
👍🏻👍🏻👍🏻
ReplyDelete