सुंदर माझ्या घरात(शरीर),
आत्मा हा नांदतो ||
चंद्र-सुर्य(डोळे) दारात गोविंद गोविंद ||
दळण दळीते मंदीरी विष्णू यावे लवकरी
चित्त माझे शुद्ध करी गोविंद गोविंद ||
दळण मी दळीले सासूपुडे ठेविले
सासू आणि सासरा दिर हा तिसरा
ओव्या गाऊ भ्रतारा तु येरे बा विठ्ठला...||
गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर
पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव
हल्ली मुक्काम औरंगाबाद
🙏🏻🙂THR 🙂🙏
No comments:
Post a Comment