Tuesday, November 10

माझ्या आजीची वही 13 © पाडूरंग श्रीरंग भजोरे मना...

पाडूरंग श्रीरंग भजोरे मना...

बारे भजोरे मना

अमौलीक जाते वय आता तरी धरा सोय 

असा मानव देह मीळेना पुन्हा

पाहुरंग श्रीरंग...

रात्र दिन करशील मौजा

केव्हायेईल यमराजा

घेऊन जाईल प्राण तुझा यमसदना

पाडूरंग श्रीरंग...

विषयाचे सुख द्वाड जिवालागे 

बहू गोड रस्ता आहे अवघड यम यातना...

पांडूरंग श्रीरंग भाजोरे मना...


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

No comments:

Post a Comment