Tuesday, November 10

माझ्या आजीची वही 14 © ओवी...

पहिली गाऊ ओवी, पहिला केला नेम तुळशीखाली राम पोथी वाचुनी वाचूनी 

दुसरी गाऊ ओवी दही दुधाची भावना रामलक्षुमणा विनंती माझीनी माझीनी 

तिसरी गाऊ ओवी त्रिखंडाच्या पायी महादेवावरी बेलापत्री नि पत्रीनि

चवथी गाऊ ओवी चवथा चांदले

मखमली गेंदले, रंग बहूनी बहुनी

पाचवी गाऊ ओवी पाची पांडवाले पाठीच्या बंधवाले विनंती माझीनी माझीनी 

सहावी गाऊ ओवी याना सीतामाई संसाराची नी याचीनी 

सातवी गाऊ ओवी लोखंडाचा दिवा मारुतीची सेवा मी ने  केलीनी  केलीनी

आठवी गाऊ ओवी आठवी गाऊ गात पंढरीची वाट मला मिळेन मीळेन  

नववी गाऊ ओवी नववा खंजीर इंद्रजित मरण रामाहातून हातून 

दहावी गाऊ ओवी शुद्ध एकादशीएवढा अन्याय रामा हातून हातून 

अकरावी गाऊ ओवी अकरावा कुरद गुरु करावा हिरद 

बारावी गाऊ ओवी बारा रविवार सुर्यनारायण तूला नमस्कार आपण सर्वांनी सर्वांनी


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

No comments:

Post a Comment