Saturday, November 14

माझ्या आजीची वही 15 © माझे माहेर

 पिंपळगाव हरेश्र्वर माझे माहेर,

आई वडिलांची भेट घेऊ कशी

ते तर गेले स्वर्गाशी

आठवण येते मला माहेराची,

भाऊ भाचे काका काकू यांच्या भेटीची आशा मला ग,

असे वाटते माहेरी जावे ग

रोज रोज स्वप्नात येतात ग,

मन आनंदित होईल ग 

माझ्या माहेरी भरलेली गंगा ग

आई वडिलांचे फार उपकार ग

त्यांचा आशीर्वाद आम्हा ग...

पिंपळगाव हरेश्र्वर माझे माहेर ग...


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

No comments:

Post a Comment