Friday, November 20

माझ्या आजीची वही 16 © दळीत तसे देव जनीच्या घरी...

 सोडून वैभव मंदिर आपुले,

सोडून द्वारकापुरी,

दळीत तसे देव जनीच्या घरी ||

शामल कोमल कांती सुंदर

तांबु शोभेपरी पितांबर,

तन्मय होऊन हरी गातसे ओवी जात्यावरी||

गहिवरले डोळे मिटूनी

श्रीकृष्णाची मूर्ती सावळी,

नाम तयाचे ओवितून ती गुंफू सुमनापरी,

दानेसरिता नयन उघडले कृष्ण सावळे तिने पाहिले

भाव फुलांचे अश्रू पडती श्रीहरी चरणावरती ||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

No comments:

Post a Comment