Friday, November 20

माझ्या आजीची वही 17 © ओवाळा ओवाळा माझ्या सदगुरु राया...

 ओवाळा ओवाळा माझ्या सदगुरु राया

पाचही तत्वाच्या ज्योती लाविल्या आता 

निराकार वस्तू कशी आकार आली 

सर्वाघटी व्यापक माझी सदगुरू माऊली

सोळासांधे बहात्तर कोठ्या कायारचली

नऊ दरवाजे खिडक्या चौफेर

आत मूर्ती बसवली 

सप्त ही सागर हरिने कैसा वेढा घातला 

ओवाळा ओवाळा माझ्या सदगुरु राया

तुका म्हणे माझा कनवाळू आला

पाझरल्या ज्योती आता ओवाळू कोणा

जिकडे तिकडे माझी सदगुरु माऊली


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

No comments:

Post a Comment