Saturday, October 17

माझ्या आजीची वही 3 © आज माझ्या हरीचा उपवास...

आज माझ्या हरीचा उपवास

हरी तुम्ही फराळ करा सावकाश ||

लाडू पेढे ताजी सांजरी, खीर खीचडी साबूदाण्यानी, ताजा द्राक्षाचा घड

आज माझ्या हरीचा उपवास ||

तुप लोणी खवासाकर, बदामबीया आवळा केसर, ताजा ऊसाचा रस

आज माझ्या हरीचा उपवास ||

रामफळ, सीताफळ

पाण्याची झारी भरूण ठेवली, साजूक आंब्याचा रस

आज माझ्या हरीचा उपवास ||

फराळ झाला चक्रपाणी, जाऊन बसले स्वस्थानास

आज माझ्या हरीचा उपवास ||

हरी तुम्ही फराळ करा सावकाश

हसून बोले द्रौपदा भगीनी,

बोलून आणूका रुखमीनी वहीणीस

आज माझ्या हरीचा उपवास ||


गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Friday, October 16

माझ्या आजीची वही 2 © म्हातारीचा परीवार...

हे पहा तुम्हाला एक गोष्ट सांगते

त्याच उत्तर तुम्हाला देता येईल का ?

हे पहा तुम्हाला एक गोष्ट सांगते...


ऐका ऐका आमच्या म्हातारीचा परीवार, 

म्हातारी लई गुणवान,

म्हातारीची कहाणी...

म्हातारीला मुले चार ?

म्हातारीला नातू अठरा ?

म्हातारीला एक मुलगी ?

लई म्हातारी गुणवान

जन्म मरण नाही तिला ?

तुकाराम शरण गेला ?


उत्तर =


हे पहा तुम्हाला एक गोष्ट सांगते

त्याच उत्तर तुम्हाला देता येईल का ?

हे पहा तुम्हाला एक गोष्ट सांगते...


ऐका ऐका आमच्या म्हातारीचा परीवार,

म्हातारी लई गुणवान,

म्हातारीची कहाणी...

म्हातारीला मुले चार ?(चार वेद) 

म्हातारीला नातू अठरा ? (अठरा पुराण) 

म्हातारीला एक मुलगी ? (एक मुलगी भक्ती देशभर फीरते)

लई म्हातारी गुणवान

जन्म मरण नाही तिला,

तुकाराम शरण गेला?

म्हातारी पुथ्वी.

गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏

Thursday, October 15

माझ्या आजीची वही 1© चुकणार नाही कधी या माणवाला...

सुख दुःख नाही चुकले देवा दिकाला चुकणार नाही कधी या माणवाला ||धृ||

सत्यशील होता तो राजा श्रियाळ

अथितीच्या भोजनासाठी कापियले बाळ,

चांगुणा कांडतसे शिर उखळाला 

चुकणार नाही कधी या माणवाला ||१||

सत्यशील नाही कोणी हरी चंद्रावाणी 

राज्य वैभव सोडून वाहे डोम्याघरी पाणी, 

हात जोडतसे तो स्मशान भूमीला 

चुकणार नाही कधी या माणवाला ||२||

सत्यशील होता तो राजा गोपीचंद

मातेच्या वचनाचा नाही केला भंग,

सोडूनी गेला तो राज्य वैभवाला 

चुकणार नाही कधी या माणवाला ||३||

श्रीकृष्णाचा जन्म झाला बंदिशाळेला

चौदा वर्षे रामप्रभू गेले वनाला,

अज्ञात वासात पांडव राहिले विराट देशाला 

चुकणार नाही या माणवाला ||४||

गहिणीनाथाने बोध केला

निवृत्ती नाथाला,

निवृत्तीने बोध केला ज्ञानेश्वराला

चुकणार नाही कधी या माणवाला ||५||

सत्यशील होती ती सीता सावित्री 

सर्प दंशाने मरीला पती,

यमापासून परत आणीले पतीच्या प्राणाला  

चुकणार नाही कधी या माणवाला ||६||

सुख दुःख नाही चुकले देवा दिकाला चुकणार नाही कधी या माणवाला ||

गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर 

पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव

हल्ली मुक्काम औरंगाबाद

🙏🏻🙂THR 🙂🙏


Friday, July 31

निसर्ग २🙂

पडती दवबिंदू पानावरती प्रसन्नहोती निसर्ग राणी हात मारिता दवबिंदूस प्रसन्नतेचा वर्षाव करिती












सांज वेळ झाली आता त्या लाजळूच्या पानांना पुन्हा मिटण्याची खोड असते !

निसर्ग १🙂

श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे रे !
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

Monday, June 29

🙏

लॉकडाऊन वाढवावे की नाही हा प्रश्न सरकार आणि शासकीय अधिकारी ठरवतील.
मला असे वाटते की लोकांमध्ये अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे जसे की लोकांना
पटउन द्यावे की ह्या व्हायरस पासून आपण सुरक्षित राहू शकतो, फक्त काळजी घ्यावी लागेल याची माहिती टीव्ही,रेडिओ,मोबाईल व तसेच रिक्षामध्ये माईक ने सांगितले जाते, परंतु ही माहिती खरोखरच लोकांन पर्यंत पोहचत आहे का? तर नाही कारण तुम्ही रिक्षा मध्ये माईक ने सांगता तो आवाज एवढा असतो की काहीच समजत नाही,मोबाईल किंवा टीव्ही मध्ये माहिती प्रसारण करताना ती माहिती खरी खोटी तपासली जात नाही आणि फॉरवर्ड केली जाते, तसेच टीव्ही वर किती लोकांना कोरोना झाला हे ठासून सांगतात पण किती बरे झालेत ही माहिती कुठे तरी कोपऱ्यात असते यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
या व्हायरस वर मुख्य औषध काय तर त्यांची हिम्मत(हे मी बरे झालेल्या लोकांचे व्हिडिओ पाहिलेत यावरून सांगते) आणि सकारात्मक विचार. 
सरकार आणि प्रशासन त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहे पण मी एक नागरिक म्हणून माझे ही कर्त्यव आहे की मी स्वतःची, माझ्या परिवाराची, माझ्या देशाची काळजी घ्यावी आता ही काळजी घ्यावी कशी? तर अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि घरातून निघाल्यावर खिशात पैसे नसतील तर चालेल पण सनिटायीझर आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा कारण कसय वेळ गेल्यावर रडण्यापेक्षा आताच सुरक्षित राहिलेले बरे.
या व्हायरस चे गांभीर्य लक्षात घ्या सोशल डीस्टन्सिन पाळा आता सोशल डीस्टन्सिन म्हणजे कोरना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात न येता त्यांना फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढवा, त्यांना हिम्मत द्या, त्यांच्या संपर्कात न येने म्हणजे त्यांना वाळीत टाकले नाही होत.
 आपण आपली, आपल्या परिवाराचे, देशाचे रक्षण करत आहोत कारण हा व्हायरस आहे म्हणजे संपर्कात आल्याने होतोय. काळजी घ्या आपली आणि परिवाराची.