Sunday, January 11

चूक...✨

🌱 स्वतःच्या चुका ओळखणं महत्त्वाचं आहे…
पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं आहे
मोठ्या चुकांपेक्षा छोट्या–छोट्या चुकांकडे लक्ष देणं.
कारण,
🔍 ह्याच छोट्या चुका वेळेत ओळखल्या
🛠️ त्यावर प्रामाणिकपणे काम केलं
🔁 आणि त्या पुन्हा होऊ दिल्या नाहीत
तर मोठ्या चुका आपोआप टळतात.
✨ यश हे एका मोठ्या निर्णयातून नाही,
तर दररोज सुधारत जाणाऱ्या
लहान लहान बदलांतून घडतं.
आज स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहा,
आपल्या छोट्या चुका सुधारा…
आणि स्वतःची उत्तम आवृत्ती घडवा. 💫

Friday, September 5

संवाद✨

 नात्यांमध्ये गैरसमज होणे अगदी स्वाभाविक आहे. प्रत्येकाच्या विचार करण्याच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळे, कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे प्रश्न निर्माण होतात. पण खरी गोष्ट अशी आहे की गैरसमज टाळता येत नाहीत, मात्र ते मिटवता नक्की येतात. त्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. आपण मनातल्या गोष्टी मनातच ठेवून दिल्या तर त्या राग, दुःख किंवा नाराजीमध्ये बदलतात. पण एकदा मन मोकळं करून समोरच्याशी बोलायला सुरुवात केली, तर गैरसमज दूर होण्याची शक्यता वाढते. संवाद हा नात्याचा श्वास आहे. जसं श्वासाशिवाय जीवन नाही, तसंच संवादाशिवाय नातं टिकत नाही. म्हणूनच, नातं टिकवायचं असेल तर मौन न बाळगता, प्रेमाने आणि संयमाने बोलणे हा एकमेव मार्ग आहे.

THR ✨ 

Friday, August 15

एकांत ✨

बस किंवा रेल्वेच्या खिडकीजवळची ती जागा…
तिथे सापडतो आपला एकांत.
आणि त्या एकांतात… मला मीच भेटते.

कधी आपण भूतकाळात हरवतो,
कधी भविष्याच्या स्वप्नात रमतो,
तर कधी वर्तमानात जगत राहतो.

या खिडकीजवळच्या एकांतात
आपले तीन जिवलग मित्र भेटतात –
भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान.

ते तिघे आपल्याला दोनच गोष्टी देतात –
आनंद… आणि दुःख.

कधी डोळ्यांतून ओघळणारे अश्रू
आनंदाचे असतात, तर कधी दुःखाचे.
पण… कधी कधी हा एकांत हवा असतो –
आपल्यातला मी पुन्हा सापडावा म्हणून.
THR ✨ 

Wednesday, August 13

मी ✨

"तुम्हाला वाटतं… मी आहे म्हणूनच जग चालतं,
पण हा… तुमचाच गैरसमज आहे.
कारण जग कधीच थांबत नाही…
जसं अखंड वाहणारं पाणी,
एकदा निघालेला शब्द,
आणि निसटून गेलेली वेळ…
सगळं पुढेच सरकत राहतं.
मग आपण का थांबायचं? 🌿✨"
THR ✨ 

Friday, August 8

परीक्षा✨

"देव परीक्षा घेतो हे माहीत होतं… 
पण आता लोकसुद्धा प्रश्नपत्रिका घेऊन बसतात, हे उशिरा का होईना, समजलं!" 😏📜
THR ✨

भाव ✨

भाव ✨

स्वतःसाठी नाही, कुणाला हसवण्यासाठी घेतलेला एक गुलाब – क्षणभर टिकतो,
 पण त्यामागचं प्रेम कायम सांगत राहतं…
“मी आहे तुझ्यासाठी, सदैव!” 💖

एका मित्राने दिलेली पेन, जरी साधी असली, तरी परीक्षेच्या शेवटच्या दिवशी 
"घे… माझं वापर!" म्हणणं 
– तेच खरं मैत्रीचं ओझं हलकं करणारं बळ! 🤝

सणासुदीला मिळणारी भेटवस्तू नव्हे, तर मनात सहज उमटलेली आठवण –
"तुला आठवलं म्हणून फोन केला..."
 हे चार शब्द म्हणजे हजार भेटवस्त्यांहून मोठं देणं! 📞💌

कधी कधी, किंमती वस्तू मनाला नाही भिडत,
पण प्रेमाने दिलेली ती छोटीशी वस्तू
हृदयात कायमची जागा घेऊन बसते… हीच खरी श्रीमंती! ✨

कारण, दिलेल्या वस्तूच्या किमतीपेक्षा
देणाऱ्याचे भावच महत्वाचे असतात… ❤️

— THR ✨

Friday, August 1

स्पर्धा ✨

🎯 "स्पर्धा दुसऱ्यांशी नको...
दररोज स्वतःशीच स्पर्धा करा!
कालच्या मीपेक्षा आजची मी भारी असली,
तरच खरी प्रगती!"
THR ✨

Thursday, July 31

एकांत ✨

"मला शांत राहायला आवडतं,
कारण माझ्या शांततेच्या जीवनशैलीत
माझ्या विचारांना पाझर फुटतो…
आणि प्रत्येक थेंब एक नवा अर्थ सांगतो.
या सगळ्यात, माझा एकांत माझा सर्वात जवळचा सोबती ठरतो."
THR ✨

Monday, July 28

चांगुलपणा✨

"चांगले वागून पण वाईट…मग वाईट वागून कुठे चांगले म्हणणार आहेत?"

"ही दुनिया चांगले वागणाऱ्यांची नाही… इथे चांगुलपणा गृहित धरला जातो, 
आणि शांतपणा दुर्बळता समजली जाते."

 "कारण चांगले वागणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यासारखंच…"

 "आता शिकतेय –चांगुलपणा राखायचा… पण स्वतःला विसरून नाही!"
THR✨

Thursday, July 10

💎 खजिना 💎

"कधी कोणत्या गोष्टीची गरज पडेल, सांगता येत नाही...
म्हणूनच प्रत्येक अनुभव,
प्रत्येक माणूस,
आणि प्रत्येक गोष्ट 
खजिन्यात जपून ठेवावी लागते.

कधी आठवण म्हणून,
कधी शिकवण म्हणून,
तर कधी आधार म्हणून ते सगळं उपयोगी पडतं.

कधीतरी क्षणभर थांबून
त्या खजिन्यात डोकावून बघा —
तिथेच सापडेल हरवलेलं समाधान."
THR ✨

Wednesday, July 9

"तुझ्या प्रेमाचा नशा"✨

"तुझ्या प्रेमाचा नशा"

तुझ्या प्रेमाचा नशा असा चढला,
की मी स्वतःचे भानच हरले...
दरवेळी तू डोळ्यासमोर असावा,
आणि काळजाचे ठोके वाढावे...

तुझ्या स्पर्शात असते एक जादू,
जी वेड लावते मनाला...
तुझ्या मिठीत विसरते जग,
फक्त तूच आठवतो साऱ्या क्षणाला...

तुझ्या नावाने हसते ओठ,
आणि डोळ्यात स्वप्नांची दुनिया सजते...
तुझ्या एका शब्दात मिळते शांतता,
जिची कुठेच सर येत नाही जगते...

प्रत्येक सकाळी तुझ्या विचारांनीच सूर्योदय होतो,
रात्र तुझ्या मिठीत चांदणं भरते...
माझ्या प्रत्येक श्वासात तू सामावलाय,
हे प्रेम... वेळेपेक्षाही जास्त तुझ्यात गुंतून जपले जाते...
THR ✨


Thursday, June 26

जबाबदारी आणि कर्तव्य✨


"जबाबदारी आणि कर्तव्यामध्ये
स्वप्नांना विसरायचं असतं..."
कारण स्वप्नं पाहणं सोपं असतं,
पण ती जगण्यासाठी आयुष्य थांबत नाही...

आई म्हणून, मुलगी म्हणून,
कधी बायको म्हणून, तर कधी सून म्हणून...
स्वतःची ओळखच हरवते,
फक्त 'कुणाची तरी' होऊन जगावं लागतं.

स्वतःच्या स्वप्नांना शांत करत,
इतरांच्या हसण्यामध्ये समाधान शोधावं लागतं...
कारण जबाबदाऱ्या कधी थांबत नाहीत –
आणि कर्तव्याची सीमा कुठेच संपत नाही.

Tuesday, June 24

"बायकांचं गेट-टुगेदर"😇

"बायकांचं गेट-टुगेदर"

"बायकांचे get-together कुठं होते हो?"
हा प्रश्न विचारला, की उत्तर फारसं शोधायला लागत नाही – ते असतं लग्नात, कुणाच्या बारशात, किंवा एखाद्या कार्यक्रमात!

घर, संसार, मुलं, स्वयंपाक, जबाबदाऱ्या – या चक्रव्यूहात अडकलेल्या बायका स्वतःसाठी वेळ कुठं काढणार? त्या भेटतात ते फक्त एखाद्या कार्यक्रमात – आणि तिथंच मग एक स्फोट होतो – गप्पांचा, आठवणींचा, आणि काहीशी चुगल्यांचाही!
जसे की,
"अगं, काय गं चाललंय तुझं?"
एखादी दोन वर्षांनी भेटलेली मैत्रीण, एकेकाळची शेजारीण, किंवा नणंद-भावजयी – कार्यक्रमाच्या गडबडीत एकमेकांच्या डोळ्यात नजर मिळते आणि गप्पा सुरु होतात.

“तुझा मोठा झाला का ग आता?”
“हो गं, दहावीला आहे, आणि ऐकतच नाही काही!”
“तू अजून नोकरी करतेस की सोडलंस?”
“नाही गं, आता घरातलीच सगळी मॅनेजमेंट!”
या काही मिनिटांच्या बोलण्यात जगभराच्या आठवणी जाग्या होतात.

😆आणि मग काय गप्पांच्या ओघात थोडं चुगल्यांचं चविष्ट तडका आलाच पाहिजे:
“अगं ती बघ, काय मेकअप केला होता काल – अगदी नटीसारखी!”
“तिचा नवरा म्हणे आता परत गावाकडे रहायला गेला!”
“तिचं मुलगं म्हणे परदेशात गेलंय... आणि आता तिने ग्रुप सुरू केला म्हणे!”
"ती ग्रुप मधून लेफ्ट झाली"
हा "चुगली टाइम" म्हणजे बायकांच्या रिलॅक्स मोडचा मूळ गाभा असतो – कुठेही कटुता नसते, फक्त दिलखुलास बोलणं!

🤍 कार्यक्रमाच्या शेवटी, जेव्हा परत जायचं वेळ येतो, तेव्हा प्रत्येक बाईच्या चेहऱ्यावर हसण्याचा, मन हलकं झाल्याचा, आणि थोडा समाधानाचा भाव असतो.
कारण त्या काही तासांत त्यांनी फक्त इतरांसाठी नव्हे, तर स्वतःसाठी थोडा वेळ दिला असतो.

🎀 शेवटी काय?
बायकांचे गेट-टुगेदर म्हणजे एक छोटासा सण.
तो साजरा होतो साडीच्या चकचकीत पदरात, गोड बोलणं आणि मायेच्या नात्यात.
अशा क्षणांतूनच जन्म घेतं – स्त्रीत्वाचं खरं सौंदर्य.

"बायका भेटल्या की चहा उकळतो ☕ आणि आठवणी नक्कीच उफाळतात😇!"
THR✨

Wednesday, June 18

सुरवात0️⃣

"प्रत्येक यशस्वी प्रवासाची सुरुवात 'शून्या'पासूनच होते... जितकी लवकर सुरुवात कराल, तितका कमी त्रास आणि त्याहून जास्त लवकर यशाचा आनंद मिळतो!"
THR✨

Sunday, June 15

एकांत...💫

कधीतरी एकांतात बसावे,
गर्दीपासून दूर, शब्दांपासून लांब…
तिथे नसावी कोणतीच चाहूल,
फक्त श्वास आणि मनाचा गूढ गूंज...
THR

Saturday, November 9

विचारातील विचार...🧠


विचारातील विचार...🧠

चर्चा करणं म्हणजे केवळ बोलणं नाही,
सांगणं म्हणजे फक्त माहिती देणं नाही,
विचारणं म्हणजे प्रश्न विचारणंच नाही,
माहीत असणं म्हणजे सर्वकाही समजलेलं असणं नाही...

माहीत करून देणं म्हणजे ज्ञान देणं,
तर माहित करून घेणं म्हणजे शहाणपण स्वीकारणं!

समजावून सांगणं हे समजून घेण्याइतकंच महत्त्वाचं –
पण समजून घेणं,
हे संवादाच्या सर्व पातळ्यांपलीकडचं असतं…

"म्हणणं" वेगळं असतं,
आणि "बोलणं" त्याहून वेगळं...
दोन्हीमध्ये भावना, हेतू, आणि संदर्भ वेगळे असतात.

शब्द एकाच वाटतात,
पण त्यामागची खोली
फक्त समजणाऱ्यांनाच कळते!
THR✨

Thursday, October 17

मनातलं...💫

मनातलं…

नुकतीच आई झालेली ती मुलगी,
शारीरिक थकवा, मानसिक गुंतवणूक, बाळाच्या नव्या जगाची जबाबदारी…
या सगळ्यात हरवलेली होती ती.

मन खूप काही सांगू पाहत होतं,
आणि म्हणून ती माहेरी आली – आपल्या आईकडे,
जिच्या मांडीवर डोकं ठेवलं की
सारा त्रास विसरायला व्हायचं…

पण ह्यावेळी वेगळंच घडलं...

ती आईला आपल्या मनातलं दुःख सांगू पाहत होती,
पण तिच्या आईच्या डोळ्यातसुद्धा काही वेगळंच दुःख दाटलेलं होतं.
आईच्या शब्दांमधील आंतरिक वेदना ऐकून
तिच्या स्वतःच्या शब्दांनीच माघार घेतली…

डोळ्यांतून अश्रू वाहू लागले,
न सांगताही खूप काही बोलून गेले…
पण मन मात्र अजूनही तडफडत होतं –
"काय करावं? कुणाशी बोलावं? कोण समजून घेईल?"

तिनं ठरवलं –
"बस, आता स्वतःलाच सावरणं हाच एक मार्ग आहे."
प्रयत्न सुरू झाले,
दररोज स्वतःला समजावत होती –
"सावर, तू आई झाली आहेस आता..."

पण...
ते ‘सावरणं’ तितकं सोपं नव्हतं.
बाहेर शांत दिसणारं चेहरं,
आतल्या कळांनी ढवळून निघालेलं होतं.

आणि मग एक क्षण आला –
ती फक्त भिंतींना, सायलीच्या फुलांना,
आणि आरशातल्या स्वतःला आपलं मन सांगू लागली…

आई बनणं म्हणजे फक्त बाळाला पाजणं, झोपवणं नव्हे,
तर स्वतःला विसरून, नव्याने जन्म घेणं असतं.
पण स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं –
हे तिला हळूहळू समजू लागलं...

"मनातलं" तिने शेवटी स्वतःच ऐकून घेतलं…
THR✨

Friday, January 19

विचारातील विचार... ✨📝

 विचारांच्या वाटेवर... ✨📝


विचारांच्या वाटेवर,

अनेक विचार नकळत मनाच्या दारात येऊन थांबतात...


अर्णवा… त्या अथांग सागरासारखे विचार –

कधी शांत, कधी वादळासारखे…


याच विचारांच्या लाटांतून

हळूहळू कवितेच्या ओळी जन्म घेतात...


शब्द हे सहज येत नाहीत,

ते विचारांच्या खोल तळातून

हळुवारपणे वर येतात –

कधी श्वासासारखे, कधी अश्रूसारखे…

THR✨


Friday, October 6

मन...3

    नेहमी प्रमाणे काम आटपून ती रूम मध्ये आली... झोपायला नेहमी प्रमाणे जवळ जवळ ११:३० झालेच होते... तिने एक नजर त्याच्यावर टाकली तर तो फोन घेऊन बसला होता... तिने उशी नीट केली आणि पाठ बेडवर ठेकवली आणि डोळे बंद केले... तेवढ्यात तिला तिच्या कपाळावर त्याच्या हाताचा थंडगार स्पर्श तिला जाणवला.... आता पर्यंत ओढलेल्या त्या चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य उमटलं... तिच्या कानाशी अगदी तिलाच ऐकू येईल एवढ्या हळू आवाजात तो बोलतो " *दमलीस का ग?* " तिने हलकं हसून नकारार्थी मान हलवली आणि हळूच नाही बोलली... तिचे ओठ जरी खोट बोलत असले तरी तिचे डोळे खर बोलत होते... त्याने तिला त्याच्या कुशीत ओढल... आणि तिच्या भोवतीची मिठी घट्ट केलं..... तीही त्याच्या मिठीत विसावली आणि मनात विचार येऊन गेला..." कसं असतं ना हे वेड *मन* ... साध्यासा २ शब्दाने सुखावून गेले... कोण म्हणत सुखी राहायला श्रीमंती गरजेची आहे... आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचे *प्रेमाचे* २ शब्द ही पुरे असतात...ह्या थकलेल्या मनावर हळुवार फुंकर घालायला... मग पुन्हा तयार होत... ते उद्यासाठी" .... ती विचार करत...त्याच्या मिठीत झोपी गेली...

Sunday, June 11

आदर...💫💫

🪞 "आपण स्वतःला दिलेल्या सन्मानावरच

आपला आत्मसन्मान उभा असतो –

दुसऱ्यांच्या नजरेत नव्हे,

तर स्वतःच्या नजरेत मोठं दिसणं गरजेचं!"

THR✨