Friday, July 31

निसर्ग २🙂

पडती दवबिंदू पानावरती प्रसन्नहोती निसर्ग राणी हात मारिता दवबिंदूस प्रसन्नतेचा वर्षाव करिती












सांज वेळ झाली आता त्या लाजळूच्या पानांना पुन्हा मिटण्याची खोड असते !

निसर्ग १🙂

श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे

श्रावण मासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे रे !
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे

Monday, June 29

🙏

लॉकडाऊन वाढवावे की नाही हा प्रश्न सरकार आणि शासकीय अधिकारी ठरवतील.
मला असे वाटते की लोकांमध्ये अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे जसे की लोकांना
पटउन द्यावे की ह्या व्हायरस पासून आपण सुरक्षित राहू शकतो, फक्त काळजी घ्यावी लागेल याची माहिती टीव्ही,रेडिओ,मोबाईल व तसेच रिक्षामध्ये माईक ने सांगितले जाते, परंतु ही माहिती खरोखरच लोकांन पर्यंत पोहचत आहे का? तर नाही कारण तुम्ही रिक्षा मध्ये माईक ने सांगता तो आवाज एवढा असतो की काहीच समजत नाही,मोबाईल किंवा टीव्ही मध्ये माहिती प्रसारण करताना ती माहिती खरी खोटी तपासली जात नाही आणि फॉरवर्ड केली जाते, तसेच टीव्ही वर किती लोकांना कोरोना झाला हे ठासून सांगतात पण किती बरे झालेत ही माहिती कुठे तरी कोपऱ्यात असते यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते.
या व्हायरस वर मुख्य औषध काय तर त्यांची हिम्मत(हे मी बरे झालेल्या लोकांचे व्हिडिओ पाहिलेत यावरून सांगते) आणि सकारात्मक विचार. 
सरकार आणि प्रशासन त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहे पण मी एक नागरिक म्हणून माझे ही कर्त्यव आहे की मी स्वतःची, माझ्या परिवाराची, माझ्या देशाची काळजी घ्यावी आता ही काळजी घ्यावी कशी? तर अत्यंत आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा आणि घरातून निघाल्यावर खिशात पैसे नसतील तर चालेल पण सनिटायीझर आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क लावा कारण कसय वेळ गेल्यावर रडण्यापेक्षा आताच सुरक्षित राहिलेले बरे.
या व्हायरस चे गांभीर्य लक्षात घ्या सोशल डीस्टन्सिन पाळा आता सोशल डीस्टन्सिन म्हणजे कोरना झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात न येता त्यांना फोन करून त्यांचे मनोधैर्य वाढवा, त्यांना हिम्मत द्या, त्यांच्या संपर्कात न येने म्हणजे त्यांना वाळीत टाकले नाही होत.
 आपण आपली, आपल्या परिवाराचे, देशाचे रक्षण करत आहोत कारण हा व्हायरस आहे म्हणजे संपर्कात आल्याने होतोय. काळजी घ्या आपली आणि परिवाराची.

Wednesday, December 18

समाजसुधारणेचे फॅट

आपल्याला जर पूर्वा पासून चालत आलेल्या बिनकामाच्या विकासाच्या आड येणाऱ्या रूढी सुधरवायचा असतील तर, असे म्हणतात की सुरुवात आपल्यापासून करावी, परंतु समाजातील काही कर्मठ परंपरा ती परंपरा असे म्हणणारे त्यात बदल घडून देत नाहीत. त्यांचे म्हणणे असते रुढी-परंपरा ते आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या पाळायलाच पाहिजेत.
समाजसुधारणा करायची तर सुरुवातीला कष्ट सहन करावेच लागतात, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेच पहा ना, त्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा त्यांच्यावर चिखलफेक केला गेला, पण त्यांना माहीत होतं आज आम्हाला म्हणजेच सर्व समाजसुधारकांना हा त्रास सहन करावा लागत आहे, परंतु भविष्यातील आजच्या भारताचे चित्र बदलायचे असेल तर त्रास सहन करावाच लागेल.
 आजही आपण समाजात पाहतो, एखादी व्यक्ती रूढी विरुद्ध वागली की लगेच ती बातमी  सर्वदूर पसरते व तिच्यावर टीका केली जाते, तिला वारंवार सांगितले जाते आपल्या रूढी परंपरा त्या रूढी परंपराच. अशाप्रकारे टोकाचे बोलणे ऐकून रूढी विरुद्ध गेलेली व्यक्ती पुन्हा कर्मठ रूढी मजबुरीने पाळते.
समजा एखाद्या ठिकाणी पूजा चालू असेल तर तेथे आवर्जून सांगितले जाते ही पूजा पुरुषांनीच करायची, ही पूजा महिलांची नाही, हे काम पुरुषांचे महिलांचे नाही आणि या स्त्री-पुरुष असमानतेत जास्त आवाज असतो तो महिलांचा. अहो, जग काय भारतच बघा की कुठे जात आहे, भारत चंद्रावर पोहोचलाय परंतु...?
या समाजात बोटावर मोजण्याइतके हुशार, काहीचे शिक्षण झाले असते, काहिंचे थोडेफार, तर काहींचे काहीच नाही परंतु या हुशार  लोकांना जी समाजात सुधारणा आणण्याची जी समज आली त्यांना सलाम..
To be continue...
☺️THR🙏

Sunday, December 8

बाजार

शिक्षणाचा बाजार ही नवीन संकल्पना आजच्या युगात अगदी वाढत चालली आहे. मग या बाजारात कोणत्या प्रकारच्या भाज्या असतील कोणत्या नवीन प्रकारच्या भाज्या येथील माहित नाही.
शिक्षण म्हणजे? याचा आजच्या काळातील पूर्ण अर्थ असा की, शि-शिकवण्या, क्ष-क्षणप्रभा, न-नदी (Teachings classes is the powerful/lighting of river) असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज मुलीला किंवा मुलाला शाळेत टाकायचे,मग ते पहिलीत नाही तर, केजी वन, केजी टू, केजी थ्री, पहिली ते दहावी, अकरावी-बारावी, डिग्री, इतर. या केजी ते डिग्री आणि अजून पुढच्या प्रवासात टिचिंग इंस्टिट्यूशन्स किंवा क्लासेस खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. खरंच?
केजी ला शाळेत ऍडमिशन घेतले की क्लासेस पण लावावे हे कंपल्सरी, क्लास त्या विद्यार्थ्यांचा आयुष्यभर पिच्छा सोडत नाहीत. आजच्या काळात पूर्ण शिक्षण होईपर्यंत क्लासेस लावणे गरजच बनली आहे. आपला पाल्य शाळेत गेला म्हणजे, त्याला किंवा तिला वाचता लिहिता आले पाहिजे त्यात नवोदयच्या परीक्षेला बसल्यावर त्यासाठी वेगळी ट्युशन, कारण "नवोदय ची परीक्षा पास व्हायला पाहिजे, आमच्या मुली किंवा मुलाच्या क्लासवाल्यानी तशी हमी 101% दिली आहे".
ट्युशन ही तशी केजी ते नववीपर्यंत चालू असते, आता दहावी किंवा मॅट्रिक किंवा एसएससी अजून किती नाव आहेत माहित नाही, अरे हो एक नाव राहिले की 'टर्निंग पॉईंट', आता दहावीला आपला मुलगा किंवा मुलगी आहे, चांगली क्लासेस लावायचे, ते म्हणतात ना हाय-फाय वगैरे, तसे मग एकच क्लास नाही दोन ट्युशन लावायच्या कारण "आमचा मुलगा किंवा मुलगी दहावीला आहे आणि असे ऐकले आहे की खूप अवघड असते ती परीक्षा". खरंच?
जशी दहावीची वरील प्रमाणे परिस्थिती तशीच बारावीची पण असते बरं का!(टर्निंग पॉईंट),अजून डिग्री त्यानंतरचे शिक्षण किंवा करिअर आहेच, त्याचे क्लासेस लावावे लागतात, म्हणजे केजीपासून तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत शाळा+ट्युशन कंपल्सरी.
आता प्रश्न पडला ट्युशन का? किंवा शिकवण्या का? जास्त नाही फक्त तीन-चार जणांना विचारले तर म्हणाले,
"अहो शाळेत शिकवत नाहीत व्यवस्थित",
"ट्युशनचे शिक्षक खूप छान शिकवतात",
"नोट्स पण सोपे आणि छान असतात क्लासेसचे"...वगैरे वगैरे.
आता शिक्षकांची भूमिका,
"तुम्ही शाळेत शिकवत का नाही?"
"अहो, वर्गात असा कोणताही विद्यार्थी नाही, कि त्याने ट्युशन लावली नाही, त्यांना ट्युशन मध्ये शिकवतात म्हणून वर्गात शिकण्याची आवश्यकता त्यांना वाटत नाही आणि शिकवायला लागलो तर मुले पुढे पुढे बोलतात, म्हणतात आमच्या क्लासेसमध्ये झाले आहे".
"पण तुम्ही शिक्षक का बनला,त्यांना अभ्यास समजून सांगावा हे तुमचे काम?"
"समजून सांगतो की"
" कुठे?"
"माझी प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन आहे, मी तेथे माझ्या विद्यार्थ्यांना समजून सांगतो, मी खूप मेहनत घेतो, मागच्या वर्षी तर जे पाच विद्यार्थी टॉप केले ते माझ्या क्लासमधली"
"का? तुमच्या शाळेतील नाही का, जेथे तुम्ही शिकवतात?"
"अहो खरं सांगितलं तर मीही रीझाइन करणार आहे, क्लासेसमध्ये प्रॉफिट खूप आहे, काही नाही करायचं फक्त एक वर्ष जीव तोडून शिकवायचे आणि मग काय आपला क्लास फेमस झाला की मग टेन्शन नाही, तेच विद्यार्थ्यांचे फोटो पोस्टरवर,फक्त वर्षे बदलायचे आणि एक-दोन आधीपासून हुशार असतात त्यांना आपल्या क्लासचे म्हणून चिठ्ठ्या पूरवायच्या म्हणजे कॉफी करायची, वाढली की नाही आमच्या क्लासची पोस्टर ची लोकसंख्या"
 ही आहे आजची सत्य परिस्थिती, शाळेतील केजी ते शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे, शाळेत शिक्षकाकडून सांगितले जाते,"माझ्या क्लास मध्ये ऍडमिशन घ्या".
आज शाळेतील शिक्षकांची विद्यार्थ्यांना जीव तोडून शिकवण्याची पद्धत होती ती नाही राहिली, काही विद्यार्थी क्लास लावतात काही नाही, पण ज्यांनी क्लास नाही लावला त्यांचे नुकसान, मग आर्थिक परिस्थिती नसतानाही क्लास लावावाच लागतो.
 खरं पाहिलं तर क्लासमध्ये शिकवणारे कोण असतात तर कॉलेजमध्ये शिकणारे वीद्यार्थी, पण यात क्लासमुळे एक चांगले आहे, बेरोजगारी कमी होत आहे.
 पण खरा शिक्षक व खरा शिक्षकी पेशा ही कमी होत चाललाय, तुमचे शिक्षण पूर्ण झाले परंतु खरे ज्ञान कुठून येणार. खरे जिवतोडून शिकवणारे शिक्षकांचा यामुळे कॉन्फिडन्स कमी होत आहे आणि शिक्षणाचा बाजार होत चालला आहे.


( वरील लेख हा ज्यांनी शिक्षणाचा बाजार मांडला आहे त्यांच्यासाठी आणि खरया शिक्षकाला त्याच्या शिक्षकी पेशाला सलाम...
जर कुणाला वाईट वाटले तर माफ करा☺️🙏)


☺️THR☺️

Saturday, November 16

विचार म्हणजे ???

विचार म्हणजे ???

 विचार म्हणजे विचार🤔
 विचार म्हणजे विचारातील विचार🤔🤔
 विचार म्हणजे घडून गेलेल्या घटनांचे पूनार्वलोकान
 (दृश्य- अदृश्य भूतकाळ)
 विचार म्हणजे घडत असलेल्या घटनांचे पूनार्वलोकान
 (दृश्य- अदृश्य वर्तमानकाळ)
 विचार म्हणजे घडणाऱ्या घटनांचे सतत पूनार्वलोकान
 (दृश्य- अदृश्य भविष्यकाळ)
 विचार म्हणजे विचार !🤔

 विचार म्हणजे कल्पना😇
 विचार म्हणजे दुःख🙁
 विचार म्हणजे आनंद☺️
 विचार म्हणजे समस्यांचे निराकरण🤗

 विचार म्हणजे विचार !🤔
 विचार म्हणजे शेवटी विचारच !!🤔☺️🙃☺️

(I used just simple words, not use hard-hard word because विचारातील विचार)

🙂THR🙂