एकतारी संगे एकरूप झालो
आम्ही गोविंद विठ्ठलाच्या भजनाथ न्हालो ||
गळा माळ शोभे आमृतरुप शांती
भक्ती भाव दोन्ही टाळ धरू हाती
टिळा विरक्तीचा कपाळास
आम्ही विठ्ठलाच्या भजनाथ न्हालो ||
भूक भाकरीची छाया झोपडीची
निवाऱ्यात घ्यावी ऊब गोधडीची
माया मोह सारे उगळून प्यालो
आम्ही विठ्ठलाच्या भजनाथ न्हालो ||
पूर्व पुण्य ज्याचे सुख मिळे त्याला
कुणी राव होई कुणी रंक होई
मागणे न काही सांगण्यासी आलो
आम्ही विठ्ठलाच्या भजनाथ न्हालो ||
गं.भा.इंदुबाई महादूशेट बडगुजर
पिंपरखेड तालुका भडगाव जिल्हा जळगांव
हल्ली मुक्काम औरंगाबाद
🙏🏻🙂THR 🙂🙏